शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

बाटली आणि झाकणात वापरला जाणारा पॉलिमरही चिंतेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:54 IST

देशात प्लास्टिकचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे.

औरंगाबाद : पिण्याच्या पाण्यासाठीच्या बाटलीत आणि झाकणात वापरला जाणारा पोलिमरदेखील चिंतेचा विषय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.या अहवालानुसार, देशात प्लास्टिकचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. एका अन्य अहवालानुसार १९५० पासून आतापर्यंत तब्बल ८३० कोटी टनापेक्षा अधिक प्लास्टिकचे उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत हा आकडा दुप्पटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जगाचा विचार केल्यास प्रत्येक मिनिटाला जवळपास १० लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या जातात आणि या सर्व बाटल्या प्लास्टिकपासून बनविल्या जातात. या पाण्याच्या माध्यमातून प्लास्टिकचे छोटे-छोटे कण आपल्या पोटात जात असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.प्लास्टिकचे हे कण केवळ बाटलीतूनच पाण्यात मिसळतात, असे नाही, तर पाऊस, कचरा, प्रदूषित पाण्यातून प्लास्टिकचे हे छोटे-छोटे कण आपल्या पाण्यात मिसळतात आणि ते पुढे शरिरात जातात.या अहवालानुसार, १५० मायक्रोमीटर (केसाच्या जाडीइतके) पेक्षा मोठे मायक्रोप्लास्टिक माणसाच्या शरीरात जाण्याची शक्यता नसल्यात जमा आहे. त्याचवेळी अगदीच छोटे मायक्रोप्लास्टिक कण किंवा नॅनो आकाराचे प्लास्टिक माणसाच्या पोटात शोषित केले जाऊ शकते. याचा परिणाम काय होऊ शकतो, याचा डेटा मात्र पुरेसा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

मुंबई08हजार मेट्रिक टन इतका कचरा मुंबईत रोज निर्माण होतो. ज्यामध्ये २२५ ते २५० मेट्रिक टन प्लास्टिक असते. मुंबईत महिन्याला २५० कोटी लिटर बाटलीबंद पाण्याची विक्री होते, अशी माहिती जलतज्ज्ञ आणि पाणी हक्क समितीचे निमंत्रक सीताराम शेलार यांनी दिली.कोल्हापूर01लाख पाण्याच्या बाटल्या जिल्ह्यात रोज विकल्या जातात. यात २० लिटर्सचे १५ हजार जार आणि उर्वरित १ ते २ लिटरच्या बाटल्या असतात. जिल्ह्यात या बाटल्यांच्या ३० कंपन्या आहेत. महापूरकाळात तर कोल्हापुरात रोज पाच लाख पाणी बाटल्यांची विक्री झाली. त्यात २० लिटर जारचे प्रमाण जास्त होते. शहरात रोज १९० टन कचरा निघतो. यात निव्वळ प्लास्टिकचा कचरा ९० टन असतो.पुणे2000ते २,२०० मेट्रिक टन इतका कचरा पुण्यात दररोज जमा होतो. त्यापैकी साधारण २५० ते ३०० मेट्रिक टन कचरा हा प्लास्टिकचा असतो. पुणे शहर व जिल्ह्यात दोनशेहून अधिक पॅकेजिंग वॉटर ड्रिंकिंग बाटल्यांच्या कंपन्या आहेत. शहरात दररोज प्लास्टिकच्या एक लिटर पाण्याचे ३५ ते ४० हजार बॉक्स विकले जातात. एका बॉक्समध्ये १२ बॉटल्स म्हणजे दररोज साधारण चार लाख ८० हजार बाटल्यांची विक्री होते. लग्नसराईत हे प्रमाण दुप्पट असते.सोलापूर80हजार बाटल्यांची विक्री शहरात रोज होते. प्लास्टिकचा कचरा रोज दीड टन जमा होतो.

सातारा20हजार पाण्याच्या बाटल्यांची शहरात रोज विक्री होते. शहरात रोज निर्माण होणारा कचरा ७० ते ७५ टन असून, यात साडेतीन ते ४ टन कचरा प्लास्टिकचा असतो.नागपूर40लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात दररोज १,२५० मेट्रिक टन कचरा निघतो. यात २,००० किलो कचरा प्लास्टिकचा असतो. दररोज किमान ५० ते ७० हजारच्या जवळपास पाणी बॉटल्स कचऱ्यात निघतात.नगर60ते ६५ हजार पाण्याच्या बाटल्यांची शहरात दररोज विक्री होते. शहरात दररोज ६ ते ७ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो.औरंगाबादते सव्वालाख पाणी बाटल्यांची विक्री शहरात दररोज होते, असे व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे यांनी सांगितले.गोवाहजार लोकसंख्या पणजी महापालिका क्षेत्रात आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे आणि पणजी राजधानी शहर असल्याने महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या दुप्पट पर्यटक येथे भेट देत असतात. पाण्याच्या बाटल्यांचा खप सुमारे २ टन एवढा असून महापालिका क्षेत्रात रोज सुमारे ७ टन सुका कचरा निर्माण होतो. त्यात सुमारे अडीच टन प्लास्टिकचा असतो.