शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Samruddhi Mahamarg: शॉर्टकटच्या राजकारणाने देश उद्ध्वस्त होईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपवरून इशारा; समृद्धी महामार्गाचे थाटात लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 06:14 IST

देशाच्या पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीमध्ये आपण मागे राहिलो. मात्र ही चौथी संधी आपण गमाव शकत नाहीत.

कमलेश वानखेडे, योगेश पांडे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात काही पक्ष शॉर्टकटचे राजकारण करत आहेत. ते जनतेच्या करातून आलेला पैसा वाया घालवत आहेत. ही राजकारणातील विकृती आहे. असे नेते व पक्ष देशविकासाचे व करदात्यांचे शत्रू आहेत. शॉर्टकटच्या राजकारणाची ही कुनीती देशाला उद्ध्वस्त करेल, अर्थव्यवस्था खिळखिळी करेल. त्यामुळे अशा पक्ष व नेत्यांपासून सावध राहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे तरुणांना केले. 

नागपूर - शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण रविवारी नागपुरातील एम्सच्या टेम्पल ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सत्ताप्राप्तीसाठी शॉर्टकट वापरणारे हे पक्ष व नेते करदात्यांचे शत्रू आहेत. सत्ता हडपणे एवढाच यांचा उद्देश आहे. आम्ही देशाचा पुढील २५ वर्षांचा विचार करतो व काही पक्ष स्वार्थापोटी देश बरबाद करू पाहत आहेत, असे मोदी यांनी आम आदमी पक्ष किंवा महाविकास आघाडीतील पक्षांचे नाव न घेता त्यांना सुनावले. 

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे मंचावर उपस्थित होते

देशाच्या पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीमध्ये आपण मागे राहिलो. मात्र ही चौथी संधी आपण गमाव शकत नाहीत. शॉर्टकटने हा देश चालू शकत नाही. स्थायी विकासासाठी दूरदृष्टी लागते. दक्षिण कोरियासह आखाती देशांनी त्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत व आधुनिक केल्या. यामुळेच सिंगापूर हे अर्थव्यवस्थेचे केंद्र बनले. या देशांमध्ये जर शॉर्टकटचे राजकारण झाले असते, तर हे देश एवढा विकास करू शकले नसते. पूर्वी करदात्यांच्या पैशांचा भ्रष्टाचार व्हायचा किंवा व्होट बँकसाठी खपला जायचा. आता सरकारी पैसा युवा पिढीच्या भविष्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे अशा स्वार्थी पक्ष व नेत्यांना उघडे पाडा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.

'आमदनी अठन्नी व खर्चा रुपय्या...'आमदनी अठन्नी व खर्चा रुपय्या. ही कुनौती घेऊन चालणारे. पक्ष देश पोखरून टाकतील अशा कुनीतीमुळे अर्थव्यवस्था बरबाद होत असून यापासून देशाला वाचवायचे आहे. दुसरीकडे आमचे स्थायी विकास व स्थायी समाधानाचे प्रयत्न आहेत. गुजरातचा निकाल हा स्थायी विकास व समाधानाचे प्रतीक आहे. नेत्यांनीही हे व्हिजन समजावे. केवळ शॉर्टकटने नाही तर स्थायी विकास करूनही निवडणुका जिंकता येतात, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लगावला.

गोसेखुर्दच्या दिरंगाईवर ठेवले बोटपंतप्रधान मोदी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या दिरंगाईवरही बोट ठेवले. ते म्हणाले ३५ वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. ४०० कोटींचा प्रकल्प होता. पण संवेदनाहीन कार्यशैलीमुळे वर्षानुवर्षे काम रखडले. आता या प्रकल्पाचा खर्च १८ हजार कोटीवर गेला. २०१४ नंतर डबल इंजिन सरकारने कामाला गती दिली. यंदा गोसेखुर्द प्रकल्प पूर्णपणे भरला गेला. तीन दशकानंतर शेतकऱ्यांना फायदा झाला, याचे समाधान आहे.

| मराठीतून सुरुवात अन् टेकडी गणेशाला वंदनरविवारी संकष्ट चतुर्थी होती. त्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवा मराठीतून केली. आज संकष्ट चतुर्थी आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना गणेशपूजन केले जाते. नागपुरातून हे कार्य होत असताना टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन, असे ते म्हणताच सभागृहात टाक्यांचा कडकडाट झाला प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना मराठमोळा फेटा घालून दिला.

समृद्धीवर पंतप्रधानांनी केला १० किमी प्रवासहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाांच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गावर झीरो पॉइंट ते टोल प्लाझा असा १० किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महामार्गाच्या नागपूर येथील झीरो पॉइंटपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर मोदींची कौतुकाची थापसमृद्धी महामार्गाच्या लोकार्पणप्रसंगी कोनशिलेचे अनावरण करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपस्थित मान्यवर फोटो काढण्यासाठी उभे होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संकोचाने थोडे दूर उभे राहत असल्याचे पाहताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जवळ ओढून घेतले आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग