शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, साहित्य संमेलनातून नितीन गडकरींचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:23 IST

राजकारण्यांनी इतरांच्या कामात हस्तक्षेप करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देराजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावेजेथे संवाद होत नाही तेते विसंवाद होतो आणि त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे मतभिन्नता असली तरी मनभिन्नता असता कामा नये

 यवतमाळ -राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. ते 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.  जेथे संवाद होत नाही तेते विसंवाद होतो आणि त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे मतभिन्नता असली तरी मनभिन्नता असता कामा नये, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उदघाटनासाठी दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यावरून राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना साहित्य संमेलनात उदभवलेल्या वादासह विविध विषयांवर भाष्य केले. गडकरी म्हणाले, ''राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे.''

तसेच मतभिन्ना असावी मात्र मनभिन्नता असू नये, आपल्याला विरोध करणाऱ्याचाही सन्मानच केला पाहिजे असा सल्लाही गडकरींनी दिला. ''जिथे संवाद होत नाही तिथे विसंदवाद होते, त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांच्या मर्यांदा सांभाळून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मतभिन्नता असली पाहिजे. पण मनभिन्नता असता कामा नये.'' असे गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी नयनतारा सहगल यांच्यावरही नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला. ज्यांना आपण मोठे समजतो. त्यांच्याजवळ जाऊन आल्यावर आपण समजतो तेवढे  ते मोठे नाहीत हे लक्षात येते. पण ज्यांना लहान समजतो त्यांच्या जवळ गेल्यावर ते खूप मोठे आहेत. हे लक्षात येते. वैशालीताईंना तुम्ही बोलावले हे चांगले केले. जीवनाच्या संघर्षामध्ये आत्मविश्वासाने कसे जगायचे हे दाखवून दिले आहे.'' असे गडकरींनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळPoliticsराजकारण