शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय कोपरखळ्यांनी ‘गळीत हंगाम’ सुरू

By admin | Updated: November 15, 2014 02:13 IST

खैरेंना दिलेली मंत्रिपदाची ऑफर, त्याचवेळी मी कट्टर शिवसैनिक असून, सेनेतेच राहणार असल्याचा खैरेंनी केलेला खुलासा.. अशा राजकीय कोपरखळ्यांनी पैठणकरांची करमणूक केली.

पैठण/जायकवाडी (जि. औरंगाबाद) :  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खा. चंद्रकांत खैरे यांना भाजपा प्रवेशाचे दिलेले अप्रत्यक्ष निमंत्रण आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खैरेंना दिलेली मंत्रिपदाची ऑफर, त्याचवेळी मी कट्टर शिवसैनिक असून, सेनेतेच राहणार असल्याचा खैरेंनी केलेला खुलासा.. अशा राजकीय कोपरखळ्यांनी पैठणकरांची करमणूक केली.  
पैठण येथील संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर लि.च्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी शहा यांच्या हस्ते झाला. यानंतर झालेल्या सभेत भाजपा-सेना नेत्यांनी परस्परांना राजकीय चिमटे काढल्याने चांगलीच रंगत आली. या कार्यक्रमात अमित शहा, चंद्रकांत खैरे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. संदीपान भुमरे एकाच व्यासपीठावर आले. कोपरखळ्यांना सुरूवात केली शहा यांनी.  खैरे यांनी जरी माङो स्वागत केले नसले तरी मी त्यांचे स्वागत करण्यास तयार असल्याचे सांगून त्यांनी खैरेंना अप्रत्यक्ष निमंत्रणच दिले. त्यांनीही लगोलग खुलासा करताना मी कडवा शिवसैनिक असून, शिवसेना कदापिही सोडणार नाही, असे जाहीररीत्या सांगून शहा यांचे आवतन नाकारले. हा कारखाना शेतक:यांनी सेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्या ताब्यात दिला, असे सांगून खैरेंनी गुगली टाकली. त्याला उत्तर दानवेंनी दिले. हा कारखाना तुमचाच आहे. यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही; मात्र, राज्य आम्ही चालवत आहोत, त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका, असा चिमटा दानवेंनी काढताच उपस्थितांत हास्याचे फवारे उडाल़े खा. खैरे व मी अनेक वर्षापासून सोबत आहोत. मी  शहा यांच्या राजकीय स्पर्शाने मंत्री झालो. खैरे तुम्हीसुद्धा अमित शहांचे आशीर्वाद घ्या तुमचेसुद्धा सोने होईल, असे दानवे म्हणताच क्षणभर शांतता निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दानवे यांनी खैरे हे केंद्रात मंत्री होतीलच, असे म्हणून पुन्हा खळबळ उडवून दिली. 
अमित शहा यांना ङोड प्लस सुरक्षा असल्याने व्यासपीठावर मोजक्याच व्यक्तींना प्रवेश होता; मात्र भाजपाचे काही हौशी पदाधिकारीही बसले. सुरक्षेच्या कारणावरून या पदाधिका:यांना खाली उतरविल्याने सेना-भाजपा कार्यकत्र्यात हमरीतुमरी झाली. (प्रतिनिधी)