शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मुंबईत राजकीय वादावादी

By admin | Updated: March 2, 2017 02:04 IST

मुंबईतील राजकीय वादावादी चांगलीच वाढताना दिसते आहे.

मुंबई : मुंबईतील राजकीय वादावादी चांगलीच वाढताना दिसते आहे. पूर्व उपनगरातील वाद तर टोकाला पोहोचला आहे. बुधवारी क्षुल्लक वादातून घाटकोपरच्या भटवाडी परिसरात शिवसेना आणि भाजपामध्ये राडा झाला. या राड्यामुळे घाटकोपर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह १० जणांना दंगलीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी परिसरात रिक्षाचालकाने शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला दमदाटी करत, गाडीसमोरून बाजूला व्हायला सांगितले. याच रागात दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची रंगली. रिक्षाचालकाने भाजपा कार्यकर्ता असलेल्या मुलाला बोलावून घेतले. घाटकोपरमध्ये भाजपाला हवे तसे यश न मिळाल्याने त्यांच्यात राग होताच. अशात याच संधीचा फायदा घेत भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमले. त्यात सेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दीही वाढली. दोन्ही पक्षांमधील शाब्दिक बाचाबाची हाणामारीत उतरली. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह १० जणांना ताब्यात घेतले. यामध्ये भाजपाचे प्रवीण विचारे, तर सेनेचे बाबू साळुंखेसह १० जणांचा समावेश आहे. या १०जणांना दंगलीच्या गुन्ह्यात अटक करण्याती आली असल्याची माहिती, घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली. मुलुंडमध्ये भाजपाच्या सहाही जागा निवडून आल्यामुळे मतमोजणीवर संशय निर्माण करण्यात आला. त्यात एका अपक्ष उमेदवाराला तर चक्क शून्य मत पडल्यामुळे संशयाची सुई आणखीनच बळावली. याच रागात मुलुंडमध्ये सर्वपक्षीयांनी मोर्चा काढत, पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली. यामुळे मुलुंडच्या कालिदास येथील मतमोजणी केंद्रातून ईव्हीएम मशिन हटविण्यात आलेले नाही. त्यांच्यावर निवडणूक अधिकारी यांच्यासह पोलिसांचे लक्ष आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, मतदानाच्या दिवशी मुंबईत ७ ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल झाले. यामध्ये ‘भाई को ही वोट देना’, उमेदवाराच्या नावाची टोपी घालून वावरणे, अशात शाब्दिक बाचाबाची अशा अनेक गुन्ह्यांना पेव फुटले होते. या प्रकरणी पंतनगर, वरळी, मानखुर्द, अँटॉपहिल, विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, तर अँटॉपहील पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही प्रकरणे निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणे गरजेचे होते. मात्र, त्यापैकी बरेचशा प्रकरणे पोलिसांनी त्यांच्या पातळीवरच मार्गी लावल्याची माहिती मिळते. मतमोजणीच्या निकालानंतर हल्ल्यात वाढ झाली. कुर्ला येथील मनसेचे विजयी उमेदवार संजय तुर्डे यांच्यावर पराभव झालेल्या भाजपा उमेदवाराने हल्ला चढविला आला. त्या हल्ल्यात त्यांची प्रकृति स्थिर असून, पसार आरोपींचा शोध सुरू आहे. हे प्रकरण आणखीनच तापण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)>सेनेकडून मतदारांसाठी व्हॉट्सअप सेवामतदार यादीतून गायब झालेल्या मतदारांसाठी शिवसेनेचा व्हॉट्सअप क्रमांक सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात त्यांनी ज्यांचे नाव नसेल, त्यांना माहिती देण्याचे आवाहन केले. जेणेकरून ती एकत्रित तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे करता येणार आहे.भांडुपचे मनसैनिकही न्यायालयाच्या वाटेवरभांडुपमधील मनसेचा गड पूर्णत: कोलमडल्याने येथील मनसे उमेदवारही न्यायालयात धाव घेणार आहेत. लवकरच ते मतमोजणी प्रक्रियेतील घोळाविरुद्ध न्यायालयात जाणार आहेत.अहो, माझे मत कुठे गेले ?मुलुंडच्या प्रभाक क्रमांक १०६ मधून हरिकृष्णा चेट्टीयार अपक्ष म्हणून उभे होते. मतमोजणीच्या निकालात त्यांना चक्क शून्य मते पडल्याने त्यांना धक्काच बसला. अहो, माझे स्वत:चे मत कुठे गेले? असा प्रश्न त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला आहे. तर दुसरीकडे मतमोजणी सुरू असतानाच, सकाळी साडेअकरा वाजता भाजपा खासदार किरीट सोमय्या सहाच्या सहा जागांवरचा विजय कसा घोषित करू शकतात? असाही सवाल उपस्थित करत, मंगळवारी मुलुंडच्या सर्व पक्षीयांनी मोर्चा काढला. मुलुंड पोलिसांकडेही लेखी तक्रार दिली. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे.