शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिश न केलेले तांदूळ अधिक पौष्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 11:37 IST

शेती कट्टा : लालदाणा असलेल्या तांदळामध्ये उपयुक्त मूलद्रव्य अधिक प्रमाणात असल्याने औषधी गुणधर्म आहेत.

- प्रमोद जाधव (उपायुक्त, समाजकल्याण)

पॉलिश न केलेले  तांदूळ अधिक पौष्टिक असतात. लालदाणा असलेल्या तांदळामध्ये उपयुक्त मूलद्रव्य अधिक प्रमाणात असल्याने औषधी गुणधर्म आहेत. वालय, बेळा व लाल मुंडगा आदी जातीच्या तांदळाची पेज अतिशय पौष्टिक आहे. एक ग्लास पेज एक सलाईनप्रमाणे ऊर्जा देते, स्थानिक भातापासून तांदूळ, उकडा तांदूळ, पोहे, भाकरी, पेज, मोदकर, लाडू, पापड/फेणी, शेवया असे विविध प्रकार बनविले जातात. या स्थानिक वाणापासून पशुधनासाठी चांगला चारा उपलब्ध होतो.

सफेद वेळा, सफेद वालय, येलकट, शिरटी, भरडे तुरई, डामगा, कोथिंबीर साळ, राजवेल, पटणी, कोलम, आंबेमोहोर, सोनफळ, लवंसाळ, वरंगळ आदी प्रकार पांढऱ्या तांदळात मोडतात. लाल तांदळात कांळा वेळा, लाल वालय, सोरटी, कोचरी, लाल मुंडगा, सनाना, राता, महाडी, दोडक, लालपटणी आदींचा समावेश आहे. अनेक चांगले गुणधर्म असूनही काही अडचणींमुळे लागवड कमी होते. शुद्ध बियाणे उपलब्ध नसल्याने त्यांचे उत्पादन नवीन सुधारित/संकरित जातीपेक्षा कमी येते.

काही जातींमध्ये फुटवा कमी येतो, तसेच काही जाती उंचीने जास्त असल्याने पीक शेवटच्या टप्प्यात जमिनीवर लोळून नुकसान होते. बियाणे निवडताना अधिक फुटवा असणाऱ्या निरोगी रोगाच्या सशक्त लॉबीतील दाणे निवडून शुद्ध बियाणे टप्प्याटप्प्याने तयार करावे, सर्वप्रथम भात शेतीचे निरीक्षण करून अधिक उंची असणाऱ्या रोपाच्या लोंब्या, बुटक्या रोपाच्या अशक्त लोंब्या, कुसळ असणाऱ्या लोंब्या, कीडरोग असणाऱ्या, तसेच पोकळ लोंब्या काढून टाकाव्यात, अशा प्रकारे भेसळ काढल्यानंतर सर्वसाधारण एकसारखे पीक दिसेल. सशक्त लोंब्यांसाठी बांधाजवळील लोंब्या न निवडता सर्व शेतातून निवडाव्यात. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या चुडातील लोंब्या निवडू नयेत. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी