शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

घोटाळे थांबविण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत धोरण

By admin | Updated: January 29, 2015 00:56 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहार थांबविण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. यासंदर्भात अभ्यास करीत असलेली समिती २३ फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टात अहवाल सादर करणार आहे.

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहार थांबविण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. यासंदर्भात अभ्यास करीत असलेली समिती २३ फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टात अहवाल सादर करणार आहे. शासनाने बुधवारी ही माहिती दिली. ‘पीडब्ल्यूडी’मधील घोटाळे कोणत्या प्रकारे नियंत्रणात आणता येतील याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये पुणे व नागपूर येथील पीडब्ल्यूडी मुख्य अभियंत्यांसह सहा-सात सदस्यांचा समावेश आहे. समितीचा अभ्यास अंतिम टप्प्यात आहे. शासन २३ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करणार अल्याची बाब लक्षात घेऊन न्यायालयाने याप्रकरणावर २५ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागात २००७ ते २०१० या कालावधीत झालेल्या ११९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ‘पीडब्ल्यूडी’मध्ये भविष्यात घोटाळे होऊ नये यासाठी शासनाचे काय धोरण आहे अशी विचारणा न्यायालयाने केली होती. यामुळे शासनाने यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रोहित जोशी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)