शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेने उधळला घातपाताचा डाव, भूसुरुंग केले निकामी

By admin | Updated: April 25, 2017 22:28 IST

भुसुरूंग उडवून घातपात घडवायचा असा नक्षलवाद्यांचा डाव होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा घातपात टळला

ऑनलाइन लोकमत गोंदिया, दि. 25 - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली ते बोरटोलाच्या या गावांदरम्यान जंगलातील डांबरी रस्त्यालगत नक्षलवाद्यांनी आपले बॅनर लावल्याचे सोमवारी उघडकीस आले होते. तेंदू कंत्राटदारांना इशारा देणारे हे बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी भुसुरूंग पेरून ठेवल्याचे वेळीच लक्षात आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने सायंकाळी ५ वाजतादरम्यान ते निकामी केले.बॅनरच्या निमित्ताने पोलिसांना त्या ठिकाणी येण्यास प्रवृत्त करायचे आणि भुसुरूंग उडवून घातपात घडवायचा असा नक्षलवाद्यांचा डाव होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा घातपात टळला. ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॅनर लावले होते त्याच्या जवळच तीन भुसुरूंग पेरलेले होते. जमिनीत स्टीलच्या डब्यात बारूद भरून त्याला प्रेशर बॉम्ब बनविले होते. याशिवाय डिटोनेटर्सचा वापर करून टायमरसुद्धा लावलेले होते. प्रेशर बॉम्ब म्हणून त्या भुसुरूंगाने काम न केल्यास पोलीस तो डबा उघडण्यासाठी जातील आणि झाकण उघडताच टायमर सुरू होऊन काही क्षणात बॉम्ब फुटेल अशी व्यवस्था केली होती. मात्र भुसुरूंगाचा एक वायर पोलिसांना दिसल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सावधपणे परिसरात तपासणी केली.  गोंदियावरून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. त्यांनी ते भुसुरूंग निकामी केले. याप्रकरणी केशोरी पोलिसांनी भादंवि कलम ४, ५ , भारतीय स्फोटक अधिनियम १८, २०, २३ बेकायदेशिर हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे भरनोली येथे पोलिसांचे सशस्त्र दूरक्षेत्र केंद्र (एओपी) आहे. तिथे २४ तास सशस्त्र पोलिसांचा ताफा असतो. तेथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी भुसुरूंग पेरून बॅनर लावण्याची हिंमत केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.