शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडी बनतेय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: February 9, 2015 05:55 IST

दुष्मनो से बचने के लिए पोलीस की कोठडी से ज्यादा सुरक्षित कोई और जगह नहीं, हा डायलॉग हिंदी चित्रपटात सर्रासपणे वापरला जातो

जमीर काझी, मुंबईदुष्मनो से बचने के लिए पोलीस की कोठडी से ज्यादा सुरक्षित कोई और जगह नहीं, हा डायलॉग हिंदी चित्रपटात सर्रासपणे वापरला जातो, प्रत्यक्षात मात्र त्याच्या विपरीत परिस्थिती बनत असल्याचे चित्र आहे. गेल्या ७ वर्षांत राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांतील विविध कोठडींत तब्बल २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी त्याचे प्रमाण वाढत राहिले असून, सरलेल्या वर्षात सर्वाधिक ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तपासावेळी आलेल्या दबावामुळे कुणी रक्तदाब वाढल्याने, कोणी हृदयविकाराच्या धक्क्याने तर बहुतांश जण जुन्या व्याधीमुळे मृत्युमुखी पडले आहेत. मात्र खाकी वर्दीवाल्याच्या ताब्यात असताना आयुष्याची अंतिम घटका मोजल्याने त्याचे खापर खात्यावर फ ोडले जात आहे. अशा मृत्यूच्या वाढत्या आलेखामुळे पोलीस कोठडी आहे की मृत्यूचे सापळे, असा प्रश्न मानवाधिकार संघटनांकडून विचारला जात आहे़ विविध गुन्ह्यांप्रकरणी तपासकामासाठी आणलेले संशयित आरोपी किंवा गुन्ह्यांसंबंधी व्यक्तींच्या नातेवाइकांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणांचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जात आहे. मात्र अद्यापही बहुतांश प्रकरणांचा तपास पूर्ण झाला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला गुन्ह्याबाबत तपासासाठी अटक केली अथवा ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याशी करावयाच्या वर्तणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मानवी हक्काबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. २४ तासांच्या आत वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर करणे, संशयित किंवा आरोपीच्या नातेवाइकांना कळविणे आदीबाबतची कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केली जात असली, तरी अनेक वेळा सराईत गुन्हेगाराकडून माहिती काढून घेण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर केला जातो. पोलिसांच्या मारहाणीमुळे तर काहीवेळा बदनामीच्या भीतीने अनेकांना धक्का बसून कोठडीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत राहिली आहे़ गेल्या सात वर्षांमध्ये पोलीस कोठडीत एकूण २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांच्या हद्दीतील पोलीस कोठडीत घडणाऱ्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या प्रकरणाची माहिती दिल्लीतील राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य सरकार व पोलीस महासंचालकांकडे पाठविली जाते. याप्रकरणी नागरी हक्क व संरक्षण विभागाचे अपर महासंचालक समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिले जाते. मात्र गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोठडीतील मृत्यूंबाबतची बहुतांश प्रकरणे अद्याप तपासात रखडलेली आहेत. अपुरे मनुष्यबळ व अन्य कामामुळे याबाबत तपास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.