शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी केली दाभोलकरांच्या आत्म्याशीच (?) चर्चा

By admin | Updated: July 7, 2014 19:26 IST

अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवघे आयुष्य वेचले असले तरी पुणे पोलिसांनी मात्र त्यांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी चक्क तंत्र विद्येचाच आधार घेतला होता.

 

ऑनलाइन टीम
पुणे, दि. ७- अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवघे आयुष्य वेचले असले तरी पुणे पोलिसांनी मात्र त्यांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी चक्क तंत्र विद्येचाच आधार घेतला होता अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हत्येच्या दोन महिन्यानंतर पुणे पोलिस आयुक्तांनी चक्क प्लॅन्चेट करुन दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा खटाटोप केल्याचा दावा एका मासिकाने केला आहे. 
नरेंद्र दाभोलकरांची गेल्यावर्षी पुण्यात भररस्त्यात हत्या गोळ्या झाडून हत्या झाली होती. दाभोलकरांचे मारेकरी अद्याप सापडले नसून सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. दाभोलकरांच्या हत्येला १० महिने झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका मासिकाने पोलिसांची नाचक्की करणारे वृत्त दिले आहे. दाभोलकरांच्या हत्येचे गुढ उकलण्यासाठी तत्कालीन पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी माजी सहाय्यक पोलिस आयुक्त रणजीत अभ्यंकर, निवृत्त कॉन्स्टेबल आणि मनिष ठाकूर नामक तांत्रिकाच्या मदतीने प्लॅन्चेट केले. हे सर्व तंत्रमंत्र पार पडले ते पुणे पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयात. तंत्रविद्येद्वारे दाभोलकरांचा आत्म्याशीही पोळ आणि त्यांच्या सहका-यांनी संवाद साधला. त्यांच्या आत्म्याशी संवाद साधून हत्येच्या पूर्वीचा घटनाक्रम  पोळ यांनी जाणून घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दाभोळकरांच्या आत्म्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. मात्र यातून पोलिसांच्या हाती काहीच आले नाही असे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. 
दरम्यान गुलाबराव पोळ यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगत वृत्त देणा-या सामाजिक कार्यकर्त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करु असे पोळ यांनी म्हटले आहे.