शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विनायक मेटेंच्या कारचालकाला पोलीस ताब्यात घेणार; अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:28 IST

विनायक मेटे यांच्या कार अपघात प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे

मुंबई - माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या अपघात प्रकरणी रसायनी पोलीस कदम यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत. त्यामुळे विनायक मेटेंचा मृत्यू अपघात की घातपात या अँगलनं पोलीस तपास करत आहेत. 

विनायक मेटे यांच्या कार अपघात प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मेटेंचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच झाला होता. पोस्टमोर्टम रिपोर्टमधून सत्य बाहेर येईल असं त्यांच्या पत्नी ज्योती मेटे म्हणाल्या. तर पुण्यात ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या कारचा २ वाहनांनी पाठलाग केला होता. त्यात एक आयशर ट्रक आणि एर्टिंगा होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. मेटे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ८ पथके नेमली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला दमन येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे विनायक मेटे यांच्या कारचालकालाही पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. 

एकनाथ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोयविनायक मेटे यांच्या अपघाताबाबत आम्हाला कळविण्यात आलेली वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. तसेच मला सुरुवातील विनायक मेटेंचा अपघात नेमका कुठे झाला आहे, हे कुणीही सांगत नव्हतं. चालकाशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तोही ठिकाण सांगू शकत नव्हता. सदर चालक गेल्या अनेक वर्षांपासून विनायक मेटेंसोबत होता. तो सातत्याने या मार्गावरुन विनायक मेटेंसोबत प्रवास करत होता. त्यामुळे त्या अपघाताचं ठिकाण सांगता येऊ न शकणं हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे मला या अपघाताबाबत संशय आहे. एकनाथ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय असा दावा त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटे