शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पोलीस सुरक्षेच्या थकबाकीचे ‘भूत’

By admin | Updated: June 8, 2014 01:51 IST

पंधरा दिवसांत मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्नी आर. आर. पाटील यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली.

मुंबई : ज्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्यात आले होते त्यांनी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आलेली नाही़ तसेच त्याबाबत त्यांची कोणतीही तक्रार  नाही वा अर्ज केलेला नाही, अशा व्यक्तींना येत्या पंधरा दिवसांत मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्नी आर. आर. पाटील यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली. 
भाजपाचे आशिष शेलार यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील महापालिकांकडे 35 कोटी, विविध बँकांकडे 8 कोटी 23 लाख रूपयांची थकबाकी आहे. पोलिसांनी विशेष व्यक्तींनाही सुरक्षा दिली होती. त्यापैकी काही जणांनी अद्यापही रक्कम अदा केली नाही. यात माजिद मेमन, नगरसेवक शरद पवार, विजय कांबळे, प्रसाद लाड, अर्शद सिद्धिकी, श्री रूपानी यांच्यासारख्या राजकीय पदाधिका:यांची नावे असल्याचे शेलार म्हणाले. 
त्याला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले की, अशा प्रकारची 89 कोटींची थकबाकी असून, महापालिकांकडे तब्बल 35 कोटी, बँकांकडे 8 कोटी 23 लाख रुपयांची थकबाकी आहे. 35 खाजगी व्यक्तींकडे सुरक्षेपोटी 2 कोटी 67 लाख 14 हजार 77 रुपए तर 1 कोटी 61 हजार 932 रुपये थकीत आहेत. यामध्ये काही जणांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस अधिका:यांनी स्वत:हून सुरक्षा दिली. त्यांनाही आता सुरक्षेचे पैसे भरण्यात सांगण्यात येत आहेत. 
याबाबतच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्या तक्रारी येत्या पंधरा दिवसांत निकाली काढण्यात येतील. मात्न ज्यांची थकबाकी आहे व त्यांच्या कोणत्याही  तक्रारी नाहीत अशा व्यक्तींना मालमता जप्त करण्याची नोटीस बाजवण्यात येतील, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली़ (प्रतिनिधी)
 
च्मुंबई : मुंबई-पुणो एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी स्पीड गन, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना रस्ते विकास महामंडळाला देण्यात आल्या असून, अपघात रोखण्याच्या दृष्टीने तीन महिन्यांत कृतीआराखडा सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
च्याबाबतचा तारांकित प्रश्न काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, 77 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्गावर ताशी 11क् किमी वेगमर्यादा शक्य असूनही तो केवळ 8क् किमी ठेवण्यात आला आहे. अपघातप्रवण क्षेत्रची माहिती एमएसआरडीसीला देण्यात आली आहे, असे गृहमंत्री  पाटील यांनी सांगितले.
 
विनयभंग ही गंभीर बाब
च्गुंड अभिषेक सिंग याने एसटी बसमधील महिला वाहकाचा भर रस्त्यात विनयभंग करावा आणि उपस्थितांनी बघ्याची भूमिका ध्यावी ही गंभीर बाब असल्याचे सभापती शिवाजीराव देशमुख म्हणाले. शिवसेना आ. नीलम गो:हे यांनी विधान परिषदेत याप्रश्नी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला. 
मोबाइल टॉवरसाठी परवानगीचे बंधन
च्सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात मोबाइल टॉवर 
आणि जाहिरातीचे होर्डिग्ज उभारण्यासाठी संस्थेतील 7क् टक्के सभासदांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याबाबतचे निवेदन शनिवारी विधान परिषदेत केले.
बीड जिल्हा बँकेचा माजी प्रशासक निलंबित
च्आर्थिक व्यवहारप्रकरणी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश सभापती शिवाजीराव देशमुख यांनी शनिवारी राज्य सरकारला दिले.
 
च्वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात येणा:या दंडाची रक्कम अगदीच किरकोळ असल्याने त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्याची विनंती केंद्र सरकारकडे यापूर्वीच करण्यात आली आहे. 
 
च्महामार्गावर वाहने थांबवून दंड वसुली करणो अशक्य असल्याने यापुढे थेट बँक खात्यातील दंडाची रक्कम वसूल करणो तसेच वाहन परवाना रद्द करण्याचा पर्याय विचाराधीन आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच महामार्गावरील व्यवस्था वाढविण्यासाठी पोलिसांची रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.