शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
3
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
4
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
5
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
6
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
7
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
8
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
9
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
10
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
11
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
12
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
13
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
14
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
15
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
16
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
17
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
18
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
19
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय

पोलिसांनीच लाटले चोरीतील नऊ कोटी

By admin | Updated: April 17, 2017 03:30 IST

येथील शिक्षक कॉलनीतील ३ कोटींच्या चोरी प्रकरणात छापा टाकायला गेलेल्या पोलिसांनी, तेथे मिळालेले तब्बल ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप केल्याचे तपासात उघड झाले आहे

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील ३ कोटींच्या चोरी प्रकरणात छापा टाकायला गेलेल्या पोलिसांनी, तेथे मिळालेले तब्बल ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप केल्याचे तपासात उघड झाले आहे. सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकासह सात कर्मचाऱ्यांवर रविवारी पहाटे कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सर्व संशयित पोलीस फरार झाले आहेत.प्रकरणाची मोठी व्याप्ती असल्याने, गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलीस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहीद्दीन उर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा), प्रवीण भास्कर-सावंत (रा. वासूद, जि. सांगोला) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संशयितांना तत्काळ अटक करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी करवीर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना दिले. मार्च २०१६ मध्ये सांगली पोलिसांना मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम मिळाली होती. त्यानंतर, तपासामध्ये मैनुद्दीन याने वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील बिल्डिंग नंबर ५ मध्ये केलेल्या चोरीतील ही रक्कम असल्याचे कबूल केले. त्यानुसार, पुन्हा वारणानगरातील एका रूमवर छापा टाकल्यावर, तेथे आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळाल्याचे पोलिसांनी दाखविले होते. त्याच वेळी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टिडेव्हलपर्सचे मालक झुंजार माधवराव सरनोबत यांनी ही रक्कम आपली असून, ३ कोटी ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर, सांगली पोलिसांनी मैनुद्दीनचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे दिला होता. (प्रतिनिधी)अशी केली हेराफेरीयेथील शिक्षक कॉलनीच्या बिल्डिंग नंबर ५ मधील रूममध्ये तपास अधिकाऱ्यांना ११ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम मैनुद्दीनच्या नावाखाली चोरीची असल्याचे दाखवून घनवट व सहकाऱ्यांनी ३ कोटी १८ लाख रुपये परस्पर घेतले, तर सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे व सहकाऱ्यांनी ६ कोटी रुपये घेऊन ते नातेवाईकाच्या बँक खात्यावर भरले.