शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना आठ सुट्यांचा मोबदला

By admin | Updated: August 9, 2015 03:02 IST

साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केलेल्या पोलिसांना एक दिवसाचा पगार देण्याच्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याला गृह विभागाला अखेर आठ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे.

-  जमीर काझी,  मुंबईसाप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केलेल्या पोलिसांना एक दिवसाचा पगार देण्याच्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याला गृह विभागाला अखेर आठ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. सुटीच्या दिवशी काम केल्याबद्दल एक दिवसाचे वेतन देण्याचे आदेश लागू करण्यात आले असले, तरी वर्षात केवळ आठ वेळा त्यांना हा मोबदला घेता येणार आहे. त्यामुळे दोन लाखांवर पोलीस या निर्णयामुळे आनंदित झाले असले, तरी त्यातील अटीमुळे पूर्ण संतुष्ट झालेले नाहीत. सुटीदिवशी काम केल्यास पूर्ण पगार देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याबाबतच्या प्रस्तावावर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याने आता तो लागू केला आहे. तब्बल ११ वर्षांनंतर पोलिसांच्या या दैनिक भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, गेल्या एक एप्रिलपासून त्याचा लाभ दिला जाणार असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.विविध उत्सव, निवडणूका, अति महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, सभेच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असावे, यासाठी वर्षातील किमान ७-८ महिने पोलिसांच्या साप्ताहिक सुटीवर गंडातर आणले जाते. अत्यावश्यक बाब म्हणून त्यांच्या सुट्या रद्द केल्या जातात. त्या बदल्यात त्यांना त्यांच्या वेतनश्रेणीनुसार दैनिक भत्ता देण्यात येत होता. मात्र त्याची रक्कम सरासरी ६० ते १०० रुपये इतकी अल्प होती. २००४ पासून त्याच्या दरामध्ये वाढ झालेली नव्हती. त्याबाबत वारंवार मागणी करूनही आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेले होते. अखेर युती सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना न्याय मिळाला. (प्रतिनिधी)सुटीच्या दिवशी काम केल्यास त्यांना पूर्ण एक दिवसाचे वेतन देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे तब्बल आठ महिन्यांपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे याबाबत पोलीस वर्तुळात प्रचंड उत्कंठा लागून राहिली होती. अखेर सर्व बाबींचे सोपस्कार पूर्ण झाल्याने हा निर्णय लागू करण्यात आला असून, मूळ वेतन अधिक भत्ते दिले जाणार आहेत.