शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती घोटाळा :कोऱ्या उत्तरपत्रिका पुन्हा सोडविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:07 IST

११ जणांना अटक; २० जणांविरुद्ध गुन्हा

नांदेड : राज्यात पोलीस भरतीत झालेले घोटाळे गाजत असतानाच आता नांदेड येथेही लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. परीक्षार्थिंनी न सोडविलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.६९ पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी उत्तरपत्रिका जाणीवपूर्वक कोºया ठेवल्या. पेपर तपासणीच्या वेळी संगणकीय विभागात काम करणाºया आॅपरेटर्समार्फत रिकाम्या उत्तरपत्रिकेवर योग्य उत्तरे भरून त्यांना ९० गुण बहाल करण्यात आले.या गैरव्यवहारात पो.कॉ. नामदेव ढाकणे (औरंगाबाद), राज्य राखीव दलाच्या जालना येथील ग्रुप ३चा पो.कॉ. शुक्राचार्य बबन टेकाळे, शेख आगा, सांगलीच्या एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष अवधूत, स्वप्निल साळुंके, आॅपरेटर प्रवीण भाटकर आणि दिनेश गजभारे यांचा सहभाग आढळून आला. तसेच काही जणांनी भरती होण्यासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये देण्याचे कबूल करून खोटे दस्तावेज तयार करून ते मूळ दस्तावेजाजागी खरे म्हणून वापरले. या प्रकरणी नऊ उमेदवार तसेच सॉफ्टवेअर कंपनीच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा आॅपरेटर प्रवीण भाटकर आहे.असा झाला घोटाळा उघडपोलीस भरतीसाठी परीक्षा दिलेल्या समाधान सुखदेव मस्के आणि किरणअप्पा मस्के (रा. देऊळगाव राजा) या दोघांना समान गुण मिळाले. देऊळगाव राजा येथील अन्य पाच जणही लेखी परीक्षेत ९० गुणांपर्यंत पोहोचले होते. एकाच गावातील सर्वांना जवळपास सारखे गुण मिळाल्याने संशय बळावला. पोलीस अधिकाºयांनी लेखी परीक्षेचे छायाचित्रण तपासले असता सदर परीक्षार्थी उत्तरे सोडविण्याऐवजी निवांत बसून असल्याचे दिसून आले. ज्यांनी पेपरच सोडविला नाही, त्यांना गुण कसे मिळाले? अधिकाºयांनी त्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या असता त्यात उत्तरे लिहिल्याचे आढळून आले! अधिक चौकशीत या भरती प्रक्रियेत संगणकीय विभाग सांभाळणाºया एसएसडी सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाºयांसह ओएमआर आॅपरेटर आणि पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे उघड झाले.

टॅग्स :Policeपोलिस