शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे हप्त्याचे रेटकार्ड

By admin | Updated: June 19, 2017 02:43 IST

काळे धंदेवाल्यांशी काही पोलिसांचे असलेले आर्थिक लागेबांधे हे कायम चर्चेचा विषय असताना नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हप्त्याचे ‘रेटकार्ड’ चव्हाट्यावर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काळे धंदेवाल्यांशी काही पोलिसांचे असलेले आर्थिक लागेबांधे हे कायम चर्चेचा विषय असताना नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हप्त्याचे ‘रेटकार्ड’ चव्हाट्यावर आले आहे. या ठिकाणी अमली पदार्थ विक्री करणारे व अन्य दोन नंबरवाल्यांकडून रोज कोण कोठून व किती रक्कम घेतो, महिन्याला लाखोंची कमाई कशी होते, वरच्या अधिकाऱ्यापर्यंत कसे पैसे पोहोचविले जातात, याची नोंद असलेली एका पोलिसाच्या डायरीतील माहिती उघड झाली आहे.दक्षिण मुंबईतील मुस्लीमबहुल वस्ती असलेले नागपाडा पोलीस ठाणे हे एक महत्त्वपूर्ण पोलीस ठाणे आहे. या ठिकाणच्या हप्ताखोरीचा प्रकार उघड झाल्याने याबाबत चौकशी करून तातडीने संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.नागपाडा पोलीस ठाण्यापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल सागरजवळील एका पानपट्टीच्या दुकानातून सर्व वसुली केली जाते. गांजा, नशेची गोळी, गुटखा याची तस्करी करणाऱ्यांकडून रोज ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतची वसुली करण्यात येते. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५०० पानपट्टीची दुकाने असून त्यापैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी हे अंमली पदार्थ विकले जात असल्याचे डायरीत नमूद आहे. त्याचबरोबर मदनपुरा परिसरातील एका हॉटेलात गोमांस उपलब्ध होत असून पोलीस या हॉटेलवाल्याकडून नियमितपणे हप्ता घेतात. त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर, बिल्डरांकडूनही वसुली घेतली जाते. कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, रमेश साळुंखे हे वसुली करीत असल्याचे डायरीत नमूद केले आहे. त्यामध्ये काही कोडवर्डही आहेत, तर काही ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोबाइल क्रमांक लिहिलेला आहे.केव्हा होते वसुली? रोज पोलिसांची सकाळची शिफ्ट संपल्यानंतर पोलीस साध्या वेशात जाऊन संबंधितांकडून वसुली करतात. पैसे वसूल करण्याची जवळपास १०० ठिकाणे आहेत. तेथे हप्ता घेण्यासाठी डीबी, मिल्क स्पेशल, गुंडा पथकातील अधिकारी, अंमलदार यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे हद्दीत अनधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. त्या ठिकाणी अमली पदार्थाची राजरोसपणे विक्री करण्यात येत आहे. मात्र पोलीस त्याकडे कानाडोळा करतात. चरस, एमडीची विक्री मोठ्या प्रमाणात होते.हप्त्याच्या रेटकार्डबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बस्वत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘अशी काही वसुली होते, हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे त्याबाबत काही सांगू शकत नाही,’ असे सांगितले.