सिंहगड रस्ता : गणेशोत्सवाच्या १० दिवसांत सिंहगड रस्ता परिसरातील गणेश मंडळे तसेच नागरिकांमध्ये समन्वय ठेवून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आनंदनगर व सन सिटी रस्ता परिसरातील मंडळे आणि नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांना पुष्पगुच्छ तसेच तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले. या दहा दिवसांच्या कालावधीत सर्व मंडळांनी एकत्र येऊन सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उत्सव करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देऊन गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणूकही सर्व मंडळांनी निर्विघ्नपणे पार पाडली. यानिमित्ताने हा सत्कार समारंभर घेण्यात आला. विठ्ठलनगर मित्र मंडळ ट्रस्ट, एकता नगरी सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ, तसेच सन सिटी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह संदीप कडू, मंगेश बुजवे, समीर रूपदे, सोमनाथ गिरी, अमोल बागुल, सचिन दाभोळकर, प्रणव कुकडे या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार
By admin | Updated: September 20, 2016 01:43 IST