शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

पोलिस कर्मचार्‍याने केला युवतीचा विनयभंग

By admin | Updated: July 10, 2014 23:06 IST

चिडीमार पथकात कार्यरत असलेला पोलिस कर्मचार्‍याने एका तरुणीला जबरदस्तीने ग्राऊंडवर नेऊन विनयभंग केला.

बुलडाणा : येथील पोलिस स्टेशनमध्ये चिडीमार पथकात कार्यरत असलेला विष्णू गाडेकर याने आपल्याच नात्यातील एका तरुणीला जबरदस्तीने जिजामाता महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर नेऊन तिचा विनयभंग केला, अशा आशयाची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे पीडित मुलीने केली आहे.पीडित मुलगी पारध येथे शिक्षण घेत असून, बुलडाणा येथील चिंचोले चौकात मैत्रिणीसोबत राहते. तिच्या आई-वडिलाने नातेसंबंधात असलेल्या पोलिस कर्मचारी विष्णू गाडेकर याच्याकडे तिची जबाबदारी सोपवली. ७ जुलै रोजी रात्री पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसह आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये जात असताना गाडेकर याने तिला भररस्त्यातून जबरदस्तीने गाडीवर बसवून जिजामाता महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर नेऊन तिचा विनयभंग केला.या दरम्यान पीडित मुलीने घटनास्थाळाहून पळ काढत स्थानिक बसस्थानक गाठले. गाडेकर याच्या भीतीपोटी ती बसने चिखलीला गेली आणि पुढे देऊळगावराजा गाठून तेथे रात्र बसस्थानकावर काढली. सकाळी तिने आपल्या आई-वडिलाला फोन करून सर्व हकिगत सांगितली, असे तक्रारीत पीडित मुलीने म्हटले आहे.दरम्यान, पोलिसांच्या चिडीमार पथकात कार्यरत गाडेकर याने भररस्त्यातून मुलीला उचलून तिचा विनयभंग केला. ही पोलिस विभागाला काळिमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सदर पोलिस कर्मचार्‍यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड तसेच पीडित मुलीच्या आई-वडिलाने १0 जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन केली आहे.** तो पोलिस कर्मचारी निलंबितपोलिसांच्या चिडीमार पथकात कार्यरत गाडेकर याने भररस्त्यातून मला उचलून नेऊन विनयभंग केला, अशी तक्रार पीडित मुलीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस कॉस्टेबल विष्णू गाडेकर याला तत्काळ निलंबित करण्यात आले असून, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर यांनी दिली.