पाथरी (जि. परभणी) : तालुक्यातील ढालेगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. पोलिसांनी ३२ आंदोलकांना ताब्यात घेतले असून,त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने कोणत्याही नोटिसा न देता गोदावरील पात्रातील कृषीपंपाची खंडित केलेली वीज जोडणी पुन्हा करुन द्यावी, जायकवाडी धरणातून ढालेगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दोनशेपेक्षा अधिक पोलीस या ठिकाणी तैनात केले होते. सकाळी आंदोलन सुरु झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या. क्षीरसागर यांचे भाषण संपल्यानंतर पोलिसांनी आंदोलन संपविण्याचा प्रयत्न केला. अवघ्या अर्धा तासात रस्ता पूर्णत: जाम झाला. पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा वापर करीत लाठीमार केला. तसेच ३२ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले़ (प्रतिनिधी)पोलिसांनीच हटविल्या बैलगाड्याअर्धातास हे आंदोलन चालले. वाहतूक खोळंबल्याने पोलिसांनी आंदोलकांना पिटाळून लावले. काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी रस्त्यावरील २५ ते ३० बैलगाड्या पोलिसांनी स्वत:हून रस्त्याच्या कडेला लावून लावल्या. वेळेचे बंधनपाळले नाही -ठाकूरपाथरी- माजलगाव हा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक मोठी आहे. त्यातही आंदोलकांनी वेळेचे भान राखले नाही. बैलगाड्यांनी रस्ता अडविला. त्यामुळे आंदोलकांना अटक करावी लागली. या दरम्यान, पोलिसांनी कुठेही बळाचा वापर केला नसल्याचे पोलीस निरीक्षक एन.बी.ठाकूर यांनी स्पष्ट केले़
आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
By admin | Updated: January 20, 2015 01:45 IST