शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

पोलिसांचा तपास जवळपास पूर्ण

By admin | Updated: September 19, 2015 03:28 IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी जवळपास पूर्ण केला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार परिस्थितीजन्य आणि तांत्रिक

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी जवळपास पूर्ण केला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे या हत्येमागील अर्थकारणाचा छडा सीबीआयला लावावा लागणार आहे. गोदादे गावातून जप्त करण्यात आलेली कवटी संगणकाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या शीनाच्या छायाचित्राशी मिळतीजुळती असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय इंद्राणी मुखर्जी आणि सिद्धार्थ दास यांचे डीएनए शीनाच्या मृतदेहाच्या अवशेषांशी जुळले आहेत.मिखाईलचा मृतदेह पुरण्यासाठी विकत घेण्यात आलेली बॅग जप्त करण्यात आली असून दादर येथील ज्या दुकानातून ही बॅग खरेदी करण्यात आली, त्या दुकानदाराचा जबाबही मुंबई पोलिसांनी नोंदविला आहे.या गुन्ह्णासाठी वापरण्यात आलेली ओपेल कारही जप्त करण्यात आली असून त्या कारमालकाचा जबाबही घेण्यात आलेला आहे. तसेच पीटर मुखर्जी आणि मिखाईल यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत.शीना अमेरिकेत असल्याचा ईमेल शीना बोराकडून मिळाल्याचे पीटर आणि मिखाईल यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. तथापि, हा ईमेल इंद्राणीनेच पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामकुमार रायचा जबाब महत्त्वपूर्ण असून या प्रकरणात त्याला माफीचा साक्षीदार करण्यासंबंधी पोलिस विचार करीत आहेत. शीनाला भाडेकरार संपुष्टात आणायचा आहे, अशा आशयाचे पत्र अपार्टमेन्ट मालकापर्यंत पोहोचविण्यासाठी इंंद्राणीने मिखाईला कसा वापर केला, हेही पोलिसांनी उघडकीस आणले आहे. ही घटना घडली तेव्हा संजीव खन्ना हॉटेल हिलटॉपमध्ये मुक्कामाला असल्याची नोंदही मिळाली असून या प्रकरणात हाही एक महत्त्वाचा पुरावा आहे. पोलिसांना सर्व फोन कॉलची माहिती मिळविण्यात यश आले आहे.शोध अर्थकारणाचा या हत्येमागे अर्थकारण असल्याचा शोध सीबीआयला घ्यावा लागणार आहे. मुंबई पोलिसांनी पूर्णवेळ न्यायवैद्यक अकाऊंटिंग पथक नियुक्त करूनही पोलिसांना या प्रकरणामागील अर्थकारणाचे धागेदोरे मिळाले नाही. मुखर्जी दाम्पत्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी अंमलबजावणी संचानालयाला लेखी विनंती करूनही ईडीकडून मुंबई पोलिसांना अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आयएनएक्स मीडिया प्रा.लि. सौद्यात मुंबईस्थित कंपनी असल्याचे समजते.