शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या मारहाणीत पोलीस निरीक्षक जखमी

By admin | Updated: January 30, 2017 03:55 IST

शहरातील हसमुख कॉलनी व सातोना रस्त्यावरील दोन घरांवर रविवारी पहाटे चोरट्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एक दाम्पत्य जखमी झाले

सेलू (जि. परभणी) : शहरातील हसमुख कॉलनी व सातोना रस्त्यावरील दोन घरांवर रविवारी पहाटे चोरट्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एक दाम्पत्य जखमी झाले तर, चोरट्यांसोबतच्या धुमश्चक्रीत पोलीस निरीक्षकही जखमी झाला.रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हसमुख कॉलनीत राहणारे ग्रामसेवक उद्धव नामदेव नागरे यांच्या घराचे गेट तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. नागरे दाम्पत्य जागे होताच त्यांना चोरट्यांनी रॉडने मारहाण केली. यात नागरे यांच्या पत्नी कुशावर्ता यांच्या चेहऱ्याला तर उद्धव नागरे यांच्या पाठीत मुका मार लागला आहे. चोरट्यांनी नागरे यांच्या कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिने व तीन मोबाईल असा ऐवज लांबविला. याच चोरट्यांनी आपला मोर्चा नजीकच्या सातोना रस्त्यावरील पोलीस निरीक्षक जे.जे. राठोड यांचे जावई प्रधान आढे यांच्या घराकडे वळविला. साधारणत: ३.३०च्या सुमारास स्वयंपाकघराचे दार तोडून चोरटे आढे यांच्या घरात घुसले. आढे दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून घरातील सोन्या-चांदीचे दागिने हिसकावून घेतले. हा प्रकार सुरू असताना घरातील एकाने पोलीस निरीक्षक राठोड यांना फोनद्वारे ही माहिती दिली. राठोड हे आपला मुलगा संतोष याला घेऊन दुचाकीने आढे यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर राठोड आणि चोरटे यांच्यात झटापट झाली. राठोड यांनी काठीने दोन चोरट्यांना बदडले. राठोड यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे. (वार्ताहर)