मुंबई : राज्य पोलीस दलातील ४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पोलिसांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दैनंदिन कामाच्या व्यापामुळे बहुतांश अंमलदारांनी तपासणी करून घेतलेली नाही. त्यामुळे आणखी कालावधी देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.सदैव कार्यरत असणाºया पोलिसांना कामाच्या ताणामुळे विविध व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे गेल्या वर्षापासून दरवर्षी ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या अधिकारी व कर्मचारी (आयपीएस अधिकारी वगळता) मधुमेह, रक्तदाब आदी विविध ११ प्रकारच्या तपासण्या मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून याचाचण्या करावयाच्या होत्या. त्यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत कालावधी निश्चित केला होता. मात्र काहींचा अपवाद वगळता पोलिसांची तपासणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मुंबई पोलीस आयुक्तांकडून करण्यात आली होती. त्यानुसार वैद्यकीय तपासणी ३१ मार्च २०१८ पर्यंत करावी, अशी सूचनागृह विभागाकडून करण्यात आली आहे.
पोलिसांना वैद्यकीय तपासणीसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:49 IST