शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' विधानामुळे मुख्यमंत्री, आठवलेंविरोधात पोलीस तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 22:05 IST

अ‍ॅड. संजय वानखडे यांच्याकडून तक्रार दाखल

अमरावती : पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अपमानास्पद भाष्य केले. या वक्तव्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे केंद्रीय मंत्री आठवलेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी तक्रार अ‍ॅड. संजय वानखडे यांनी रविवारी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांत केली. ३ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या गीताचा अपभ्रंश करून म्हटले की, 'माझी मैना गावाकड राहिली, म्हणून मी मुंबईकडे दुसरी पाहिली'. आठवले यांच्या या व्यक्तव्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आठवलेंच्या या व्यक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचे हे शब्द शांतता व सुव्यवस्था बिघडवू शकतात. त्यांनी शासकीय कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांचा अपमान केला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. सोबतच पिंपरी चिंचवड येथील महापालिका प्रशासनही जबाबदार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९५(अ), ५०४, १२०(ब) व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचे कलम ३(१), (यू), (व्ही) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाची तक्रार मानवहित लोकशाही पक्षाचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. संजय वानखडे यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिली आहे. याबद्दलची तक्रार मिळाली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाईची दिशा ठरेल, असे ठाणेदार पंजाब वंजारी यांनी सांगितले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Athawaleरामदास आठवले