शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीचा स्लॅब कोसळला

By admin | Updated: August 4, 2016 01:46 IST

शहर-उपनगरातील पोलीस वसाहतींची मोठी दुरवस्था असल्याने या वसाहतींची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा पोलिसांकडून करण्यात येते.

मुंबई : शहर-उपनगरातील पोलीस वसाहतींची मोठी दुरवस्था असल्याने या वसाहतींची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा पोलिसांकडून करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने याचा परिणाम पोलीस कुटुंबीयांना भोगावा लागत आहे. बुधवारी अशाच प्रकारे घाटकोपर पोलीस वसाहतीमध्ये घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून पोलीस पत्नी जखमी झाली आहे. सुदैवाने घरातील लहान मुले दुसऱ्या खोलीत असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे.घाटकोपर पूर्वेला स्टेशनजवळ असलेल्या न्यू पोलीस वसाहतीमधे ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस कुटुंबियांसाठी याठिकाणी तीन इमारती असून यामध्ये एकूण ६० कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतींची डागडुजीच न झाल्याने छतामधून पाणी येणे, इमारतींना तडे जाणे हे प्रकार नेहमीच याठिकाणी सुरु आहेत. याठिकाणी राहणाऱ्या पोलीस कुटुंबियांनी याबाबत अनेकदा बांधकाम विभागाकडे तक्रारी दिल्याआहेत. मात्र त्यांच्याकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने अनेकदा इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. मात्र यामध्ये कोणालाही इजा झाली नव्हती. मात्र बुधवारी दुपारी सुमन शंकर बनगर या पोलीस पत्नी घरात झोपलेल्या असताना अचानक त्यांच्या अंगावर हा स्लॅब कोसळला. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेनंतर वसाहतीमधील पोलीस कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)