शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

पोलिसांच्या चुकीने एकास अटक

By admin | Updated: June 3, 2015 05:03 IST

राज्य पोलीस दलाकडे मांस ओळखण्याचे कोणतेही तंत्र नसल्याचे स्पष्ट झाले असून वरळी पोलिसांनी अलीकडेच गोमांस विकण्याच्या

मुंबई : राज्य पोलीस दलाकडे मांस ओळखण्याचे कोणतेही तंत्र नसल्याचे स्पष्ट झाले असून वरळी पोलिसांनी अलीकडेच गोमांस विकण्याच्या आरोपात एका खाटिकाला अटक केल्यानंतर ते म्हशीचे मांस असल्याचे उघड झाल्याने पोलिसांवर नामुष्की ओढवली आहे.गोमांस विकण्याच्या आरोपात वरळी पोलिसांनी अलीकडेच एका खाटिकाला अटक केली होती. पुढे ते गोमांस नसून म्हशीचे मांस असल्याचे स्पष्ट झाले. हस्तगत केलेले मांस ओळखण्याचे कोणतेही तंत्र उपलब्ध नाही. त्यामुळे पोलीसच काय पण या चाचण्या करणाऱ्यांनाही प्रथमदर्शनी मांसाचे वर्गीकरण करणे कठीण आहे. प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच ते स्पष्ट होऊ शकते. कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत मांसाचे वर्गीकरण किंवा ओळखण्याचे तंत्र आहे. त्यासाठी तज्ज्ञांचे पथक आणि यंत्रसामुग्रीही उपलब्ध आहे, अशी माहिती सहसंचालक दौंडकर यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्यात अशा सहा प्रयोगशाळा असून मांसाची ओळख पटविण्यासाठी अनेक नमुने आले आहेत. त्यांची तपासणी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात गोवंश हत्याबंदी लागू झाल्यापासून हिंदुत्ववादी संघटना मांस विक्रेत्यांविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी करत आहेत. त्यामुळे पोलीस अनेक ठिकाणी धाडी टाकून मांस विक्रेत्यांना अटक करत आहेत. वरळीत गेल्या महिन्यात अक्रम कुरशी हे गोमांस विक्री करत असल्याची तक्रार भारतीय गोवंश रक्षण व संवर्धन परिषदेचे सदस्य आणि प्रा. शरद गुप्ता यांनी पोलिसांकडे दिली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी कुरेशीला अटक केली व त्याच्याविरोधात नवीन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला. तसेच त्याच्याकडे असलेले मांस चाचणीसाठी परळ येथील बॉम्बे व्हेटरनरी महाविद्यालयाकडे पाठवले. महाविद्यलयाच्या प्रयोग शाळेने गेल्या आठवड्यात याचा अहवाल दिला. ते गोमांस नसून म्हशीचे मांस असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान कोणतीही शहानिशा न करता अथवा मांसाचे नमुने तपासल्याखेरीज कोणालाही अटक केली जाऊ नये, असे आदेश मुंबईचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)