शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

कविवर्य शंकर वैद्य यांचे निधन

By admin | Updated: September 23, 2014 12:50 IST

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला या अजरामर शब्दरचनेतून रसिकांवर छाप पाडणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ - कालस्वर, दर्शन या कवितासंग्रहांमधून मराठी रसिकांच्या मनात स्थान पटकावणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. दादरमधील सुश्रुषा रुग्णालयात वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी १२ वाजता वैद्य यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे. वैद्य यांच्या निधनामुळे काव्य जगत पोरके झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. 

जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात १५ जून १९२८ रोजी शंकर वैद्य यांचा जन्म झाला. निसर्गरम्य वातावरणात वैद्य यांचे बालपण गेल्याने त्यांच्या कवितांमधूनही निसर्गप्रेम दिसून यायचे. यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी वैद्य जुन्नरमध्ये आले. कौतुकाची थाप म्हणून वैद्य यांना एक कविता संग्रह देण्यात आला व यानंतर वैद्य यांची पावले साहित्याकडे वळली. आला क्षण, गेला क्षण हा वैद्य यांचा पहिला कथासंग्रह. मात्र हा कथासंग्रह काहीसा दुर्लक्षितच राहिला.
वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून बीए व एम.ए केले. त्यानंतर  त्यांनी सात वर्षे नोकरीही केली. मात्र या काळातही त्यांचे कविता लेखन सुरुच होते. कालस्वर व दर्शन हे त्यांचे काव्यसंग्रह चांगलेच गाजले. वैद्य यांनी रेडिओवरुन कवितावाचनही केले व त्यांचा हा कार्यक्रम रसिकांनाही चांगलाच भावला होता. काव्यसमीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीत कोण? आम्हां पुसायचे नाही, आई दिसली, उभी उंच सरस्वती या अशा दर्जेदार शब्दरचनांमधून वैद्य यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले. गेल्या काही वर्षांपासून वैद्य आजारी होते. अखेर मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल कवी महेश केळुस्कर, अशोक नायगावकर यांनी शोक व्यक्त केला आहे.