शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचा दैनिक पास ५० रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:34 IST

येत्या ३० आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पीएमपीकडून प्रवाशांना दैनिक पास अवघ्या ५० रुपयंत देऊन अनोखी भेट देण्यात येणार

पुणे : संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गाला येत्या ३० आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पीएमपीकडून प्रवाशांना दैनिक पास अवघ्या ५० रुपयंत देऊन अनोखी भेट देण्यात येणार आहे. येत्या १४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ही सवलत मिळणार असून तिचा फायदा लाखो प्रवाशांना घेता येईल. हा पास सध्या ७० रुपयांना दिला जातो. त्यावर शहरात संपूण दिवसभर कोठेही प्रवास करता येतो. दरम्यान, या निर्णयाचे प्रवासी संघटना तसेच प्रवाशांनी स्वागत केले असून या सवलतीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यापुढेही ती कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.महापालिकेकडून शहरात १०१ किलोमीटर मार्गाची बीआरटी सुरू करण्यात येणार आहे. त्याला ‘रेनबो बीआरटी’ असे नाव देण्यात आले आहे. त्या अंतर्गत मागील वर्षी ३० आॅगस्ट २०१५मध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर औंध ते रावते, किवळे आणि नगररस्ता या मार्गांवरही ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)>सर्व केंद्रांवर सुविधाप्रवाशांना बीआरटीकडे आकर्षित करण्यासाठी प्रशासनाकडून ही अनोखी भेट देण्यात येणार आहे. १४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत पीएमपीची सर्व पास केंद्रे तसेच बसमधील वाहकांकडे हे सवलतीचे पास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. >१० किमीसाठी १० रुपये आकारावेतपीएमपी प्रशासनाकडून सवलतीत पास देण्याच्या निर्णयाचे स्वागत पीएमपी प्रवासी मंचाने केले आहे. मात्र, ही सवलत १४ आॅगस्टपासून सुरू न करता उद्यापासूनच सुरू करण्यात यावी, तसेच पासची ही किंमत कायम असावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे.याशिवाय संघटनेने यापूर्वी केलेल्या मागणीनुसार, मासिक पास २५० रुपये, १० किलोमीटर अंतरासाठी १० रुपये करावेत, अशी मागणीही संघटनेने केली. या सवलतीच्या पासची मोठ्या प्रमाणात पीएमपी प्रशासनाने जनजागृती करावी, अशी मागणीही मंचाच्या वतीने प्रभारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली.