शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारभाऱ्याविना धावतेय ‘पीएमपी’

By admin | Updated: July 23, 2016 01:35 IST

साडेअकरा हजार कर्मचारी आणि तब्बल १,५०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या पीएमपीचा संसार दोन आठवड्यांपासून वाऱ्यावर आहे.

पुणे : तब्बल १० लाख दैनंदिन प्रवासीसंख्या, २ हजारांहून अधिक बस, साडेअकरा हजार कर्मचारी आणि तब्बल १,५०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या पीएमपीचा संसार दोन आठवड्यांपासून वाऱ्यावर आहे. तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नाशिकला बदली झाल्यानंतर पीएमपीला स्वतंत्र अधिकारी देण्यास राज्य शासनाला वेळ नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच या पदावर नवीन अधिकारी राज्य शासनास देणे शक्य नसल्याचे सूतोवाच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना केले आहे. त्यामुळे पीएमपीचा संसार वाऱ्यावरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना सक्षम वाहतूकव्यवस्था देण्यासाठी २००७मध्ये पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ८ वर्षांत तब्बल १४ व्यवस्थापकीय संचालकांची नेमणूक या राज्य शासनाने केली आहे. त्यात अनेकदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आयुक्तांकडे हा पदभार देण्यात आला आहे.या संचालकांमध्ये केवळ डॉ. श्रीकर परदेशी आणि अभिषेक कृष्णा हेच सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच त्यांतही परदेशी यांच्याकडे मुद्रांक शुल्क आयुक्तपदाबरोबरच पीएमपीचा पदभार होता. तर, अभिषेक कृष्णा हे पूर्णवेळ संचालक होते. त्यानंतर पीएमपीकडे लक्ष देण्यास राज्य शासनाला वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. कृष्णा यांची ७ जुलै रोजी नाशिकच्या आयुक्तपदी बदली झाली. तसेच, पीएमपीचा पदभार स्मार्ट सिटी आणि महापालिकेचा गाडा सांभाळणारे पालिका आयुक्त कुमार यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर पीएमपीची नवीन बसखरेदी, बीआरटी मार्ग, स्मार्ट सिटीअंतर्गत पीएमपीच्या कामकाजात अत्याधुनिक सुधारणा या पार्श्वभूमीवर राज्य शासन तातडीने नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करेल, असा कयास केला जात होता. मात्र, कृष्णा यांच्या बदलीला दोन आठवडे पूर्ण झाले तरी शासनाकडून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)>कामकाज गडबडले४कृष्णा यांच्या बदलीनंतर पीएमपीचे दैनंदिन कामकाज गडबडले आहे. कृष्णा यांनी जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांची बदली केली होती. त्यातच जनरल मॅनेजरपदी असलेले विलास धारूरकर यांनी राजीनामा दिला असून, सह व्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे हे रजेवर असल्याने नियोजन गडबडले आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला असून, परिणामी आर्थिक ताळेबंद बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच महापालिका आयुक्तांकडे स्मार्ट सिटीचे काम असल्याने त्यांना पालिकेच्या कामात लक्ष देण्यास वेळ नसताना त्यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी असल्याने पीएमपीच्या दैनंदिन नियोजनात विस्कळीतपणा आल्याचे चित्र आहे.