शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रामायणकालीन भुयारी मार्ग शोधणार, पीएमओचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:53 IST

प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकमध्ये अज्ञातवासात राहण्यासाठी त्यांनी वापरलेल्या गोपनीय भुयारी मार्गाचा शोध घेण्यासाठी आता थेट पंतप्रधान कार्यालयाने पाऊल

- लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकमध्ये अज्ञातवासात राहण्यासाठी त्यांनी वापरलेल्या गोपनीय भुयारी मार्गाचा शोध घेण्यासाठी आता थेट पंतप्रधान कार्यालयाने पाऊल टाकले आहे. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे संबंधित पत्र पंतप्रधान कार्यालयाने उचित कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविले आहे. त्यामुळे पंचवटीतील सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यामधील भूमिगत मार्गाचे उत्खनन होऊन त्यातून रामायणकालीन पौराणिक इतिहासाला उजाळा मिळू शकणार आहे. येथे भाविक सीतागुंफा आवर्जून पाहतात. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचेदेवांग जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिशांच्या कालावधीत म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियरमध्ये येथील भुयारी मार्गासंदर्भात उल्लेख आहे. नाशिक त्र्यंबक गॅझेटियर १९४२ मध्ये प्रसिद्ध झाले, त्यातही हा संदर्भ आहे.सीतागुंफा म्हणजे सीतामाई यांच्या वास्तव्याचे स्थान. गुंफेच्या पाठीमागील बाजूस शिवलिंग असून, तेथून ते सात मैल लांब मखमलाबादच्या पुढे रामशेज किल्ल्यापर्यंत हे भुयार होते. प्रभू रामचंद्र या भुयारी मार्गानेच रामशेज नावाने परिचित असलेल्या ठिकाणी शयनासाठी जात असत. प्रभू रामचंद्र अज्ञातवासात असताना दंडकारण्यात भ्रमंती करताना सीतामाईला सुरक्षित ठिकाणी म्हणजेच गुंफेत ठेवत, त्यालाच सीतागुंफा हे नाव पडल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.सध्या गुंफेतील शिवलिंगाजवळील मार्ग बंद आहे. तो शोधल्याने पौराणिक इतिहास खुला होऊ शकेल. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले होते. ते त्यांनी पुरातत्त्व खात्याला पाठविले आहे. त्याची प्रतही मिळाल्याचे जानी यांनी सांगितले.प्रभू रामचंद्रांनी या भुयारी मार्गाचा वापर केला, अशी नोंद आहे. रामायणकालीन अनेक घटना पुढे येण्यासाठी पुरातत्त्व खात्याने उत्खनन करणे आवश्यक आहे.- देवांग जानी, गोदाप्रेमी नागरी सेवा समिती

सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे उल्लेख आहेत. फक्त दोन सीतागुंफा आहेत. त्यामुळे भुयारी मार्ग कोणत्या गुंफेपासून आहे, हे शोधावे लागेल.- दिनेश वैद्य, अध्यक्ष, व्यास ओरिएंटल रिसर्च