शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

'पंतप्रधानांनी पीएमसी बँक प्रकरणी हस्तक्षेप करावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:48 IST

काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी खातेदारांना दिलासा देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे.पीएमसी बँक प्रकरणी मुंबई कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. पीएमसीबाबत राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी. पीएमसी बँकेचे दुसऱ्या मोठ्या बँकेमध्ये विलीनीकरण करावे किंवा ज्या प्रकारे राष्ट्रीयीकृत बँकांना रिव्हायव्हल पॅकेज दिले जाते, त्याप्रमाणे पीएमसी बँकेलाही पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी केली. खातेदारांना दिलासा देण्यासाठी त्वरित पावले उचलून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसने केली.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात भाई जगताप, चरणसिंग सप्रा, गणेश यादव, झिशान सिद्दीकी आदी नेत्यांचा समावेश होता. याबाबत एकनाथ गायकवाड म्हणाले, आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याने १६ लाख खातेधारकांची परवड सुरू झाली आहे.बँकेत जमा असलेल्या स्वत:च्या पैशांसाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. ११ खातेदारांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे व लाखो खातेदार दडपणाखाली जगत आहेत. पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही. नियमबाह्य पद्धतीने एचडीआयएलसारख्या कंपन्यांना लाखोंचे कर्ज देण्यात आले. याला सर्वस्वी पीएमसी बँकेचे मॅनेजमेंट व आरबीआयचे आॅडिटर्स जबाबदार आहेत. जाणूनबुजून त्यांनी ११ वर्षे या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर आम्ही आज राज्यपालांची भेट घेत उपाययोजना करण्याची मागणी केली.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकNarendra Modiनरेंद्र मोदी