शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो’; पंतप्रधान मोदींच्या शिवशाहिरांना मराठीतून शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 11:03 IST

देशाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा देणे ही खूप मोठी गोष्ट असल्याची भावना शिवशाहिरांनी व्यक्त केली.   

पुणे : ‘मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांनी शिवाजी महाराजांचा उभा केलेला आदर्श आणि शिकवण आचरणात आणण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी, अशी मी प्रार्थना करतो...’ अशा मराठमोळ्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अभीष्टचिंतन केले. देशाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा देणे ही खूप मोठी गोष्ट असल्याची भावना शिवशाहिरांनी व्यक्त केली.    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी तिथीनुसार वयाच्या शंभरीत पदार्पण केले. यानिमित्त त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्यांचे १०० दिव्यांनी औक्षण करण्यात आले. याप्रसंगी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्रबुद्धे आणि  ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवशाहिरांना मानाचा मुजरा केला.मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती बाबासाहेबांची असलेली निष्ठा आणि त्यांचे विचार जगभरात पोहोचविण्यासाठी घेतलेली मेहनत याविषयी गौरवोद्गार काढले. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाचा इतिहास लिहिताना बाबासाहेबांसारखी प्रेरणा घेत प्रामाणिकतेच्या कसोटीवर लेखन करावे, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे