शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी म्हणाले, हरिभाऊ कुणालाही काही सांगू नका’; मराठवाड्याला दुसऱ्यांदा राज्यपालपदाची संधी

By विकास राऊत | Updated: July 29, 2024 06:18 IST

राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन दिवसांतील घडामोडींचे आश्चर्यकारक अनुभव सांगितले. 

विकास राऊत, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी फोन आला, ते म्हणाले, ‘हरिभाऊ तुम्हाला महाराष्ट्राबाहेर पाठवायचे आहे, तयार राहा,  कुणालाही काहीही सांगू नका. बाकी काय चालले आहे?’. मी म्हणालो ‘व्यवस्थित आहे’ एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला. परंतु, मी थोडा वेळ संभ्रमात पडलो, त्यानंतर पूर्ण दिवस मतदारसंघातील कामांत गेला. मध्यरात्रीनंतर केंद्र शासनाने माझी राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याचे मला कार्यकर्त्याने कळविले. तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. परंतु, मोदींनी सकाळी फोनवर जे सांगितले होते, त्याचा संदर्भ रात्री लागला. राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर आ. हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन दिवसांतील घडामोडींचे आश्चर्यकारक अनुभव सांगितले. 

बागडे म्हणाले, ‘माझ्या मनातही नव्हते की, असा काही निर्णय होईल. रविवारी सकाळपासून फुलंब्रीत पूर्ण दिवस गेला, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली’. पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ राहिलात, त्याचे हे फळ आहे काय, यावर आ. बागडे म्हणाले, ‘१९८० मध्ये भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचे काम करीत आहे. त्यापूर्वी जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. १९६७ सालापासून सर्व निवडणुकीत सहभागी आहे. भाजपने विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. 

आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष पदावर काम केले. कार्यकर्ता म्हणून जे सांगितले ते काम केले. त्यामुळे पक्ष, राज्य आणि केंद्र शासनाने या पदावर काम करण्याची संधी दिली. संघाचा जिल्हा पदाधिकारी म्हणून देखील काम केले. जनसंघातही अनेक वर्ष काम केले. संघ, जनसंघ, भाजपमधील काम करण्याची पद्धतीची माहिती आहे. किसान संघ, सहकार भारतीमध्ये पहिल्या कार्यकारिणीत होतो. 

शपथविधी कधी होणार...

२९ जुलै रोजी मुंबईला जाणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, तेथेच राजस्थान राजभवनमधील अधिकारी येतील. त्यांच्याशी चर्चा होईल. त्यानंतर पुढील कार्यक्रम काय असेल ते कळेल. शपथविधीबाबत अजून काही माहिती नाही, असे बागडे म्हणाले. 

दुसरे राज्यपाल...

मराठवाड्यात यापूर्वी शिवराज पाटील-चाकूरकर यांची २०१० साली पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती  झाली होती. त्यांनी आ. बागडे यांच्या रूपाने विभागाला घटनात्मक अशा राज्यपालपदावर नियुक्ती मिळण्याची संधी मिळाली आहे.

 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajasthanराजस्थान