डॉ. किरण वाघमारे / अकोलानिसर्गाच्या सान्निध्यात काही काळ घालवायचा असेल तर गुल्लरघाट-खटकाली सारखी शांत जागा दुसरी नाही. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेली ही ठिकाणे पर्यटकांना आनंद दिल्याशिवाय राहत नाहीत. अकोल्यापासून जवळच असलेल्या या रमणीय ठिकाणांना श्रावण महिन्यात भेट दिली तर निसर्गाचे विलोभनीय रूप अनुभवण्यास मिळाल्याशिवाय राहत नाही. गुल्लरघाट-खटकाली ही दोन्ही ठिकाणे आकोटपासून जवळ आहेत. धारगडच्या वाटेवरच खटकाली आहे. खटकालीच्या चहूबाजूने निसर्गाचा अनुपम नजराणा अनुभवण्यास मिळतो. खटकाली गावात पर्यटकांना राहण्याची इच्छा झाल्यास त्यांच्यासाठी विश्रामगृह सज्ज आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद येथे पर्यटकांना मिळतो. खटकाली गाव सोडून पुढे चालू लागलो की, मोठा धबधबा आपल्या नजरेस पडतो. मुख्य रस्त्यापासून एक कि.मी. आत चालत गेले की हा धबधबा दिसतो. याला ह्यसुलईह्ण किंवा ह्यसूर्याह्ण धबधबा म्हणून ओळखल्या जाते. धबधब्यापासून काही अंतरावर जंगलात चालू लागल्यावर ह्यहायअस्ट पॉइंटह्ण आहे. हा या परिसरातील सर्वात उंच भाग आहे. येथून मेळघाट अभयारण्याचे विलोभनीय दर्शन घडते. या परिसरात फिरताना अनेक लहान-मोठे धबधबे नजरेस पडतात. खटाकालीवरून पुढे गेल्यानंतर गुल्लरघाट किंवा गोटूल हे आणखी एक निसर्गरम्य पर्यटन केंद्र आहे. येथे आकोट वन्यजीव विभागाने निसर्ग वाचन केंद्र उभारले आहे. येथे घराच्या भिंतीवर आयुर्वेदिक वनौषधींची माहिती देणारे चित्र काढलेले आहेत. हे चित्र अप्रतिम असे आहेत. वन्य जीवांची माहितीदेखील या केंद्रात प्रदर्शित केली आहे. वनांविषयीची संपूर्ण माहिती या परिचय केंद्रात मिळते. येथे ट्रेकिंग करणार्यांसाठीदेखील चांगली सुविधा आहे. मनसोक्त उडणारे रंगबिरंगी फुलपाखरं आपले मनोरंजन करण्यासाठी येथे सदैव तयार असतात. परिसरातील आकर्षक जंगली फुलं आपल्याला एक वेगळचं समाधान देऊन जातात. गुल्लरघाटचा निसर्ग अनुभवण्याची मजा काही औरच आहे. सकाळपासून सुरू झालेली आपली सहल सायंकाळ कशी झाली, याची आठवणदेखील होऊ देत नाही. आनंददायी ठरावी, अशी ही सहल आहे.
गुल्लरघाट-खटकालीची आनंददायी सहल
By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST