शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

झटपट यशासाठी खेळाडू ड्रग्ज घेतात, ते योग्य नाही- मिल्खा सिंग

By admin | Updated: May 8, 2016 22:35 IST

एखादा तरुण किंवा तरुणी मिल्खा सिंग बनेल आणि ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड क्रीडाप्रकारात आपल्या देशाचा तिरंगा फडकावेल, अशी इच्छा आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 8- रोम आॅलिंपिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही, याची मला सारखी खंत वाटते आणि दु:ख होते. मी आता नव्वदीच्या घरात आहे. हे जग सोडण्यापूर्वी एखादा तरुण किंवा तरुणी मिल्खा सिंग बनेल आणि ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड क्रीडाप्रकारात आपल्या देशाचा तिरंगा फडकावेल, अशी इच्छा आहे. हा सुदिन उजाडण्याचीच मी वाट पाहत आहे, असे भावपूर्ण उद्गार फ्लार्इंग सिख मिल्खा सिंग यांनी काढले.कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पोचा (पीआयएसई) रविवारी समारोप झाला. यानिमित्त रिओ आॅलिंपिकसाठी स्पर्धकांना शुभेच्छा देण्याचा, तसेच यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. या वेळी मिल्खा यांनी आपल्या आयुष्यातील हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना हेलावून सोडले. व्यासपीठावर विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे उपस्थित होते.खेळाडूंना सल्ला देताना ते म्हणाले, की आमच्या पिढीने, तसेच पी. टी. उषा, अंजू जॉर्ज अशा खेळाडूंनी खूप मेहनत केली. आजच्या पिढीला मात्र झटपट यश हवे आहे आणि म्हणून अनेक जण ड्रग्ज घेतात, हे योग्य नाही. यामुळे अनेक स्पर्धांत आपली पदके काढून घेतली गेली. देशाची नाचक्की झाली. तरुण खेळाडूंनी ड्रग्जचा नव्हे, मेहनतीचा पर्याय निवडावा. पैशासाठी मॅच-फिक्सिंगही करू नये. फाळणीच्या रक्तरंजित इतिहासाचे साक्षीदार असलेल्या मिल्खा सिंग यांनी देशप्रेमाचा सल्ला दिला. जेथे जाल तेथे देशाचा लौकिक उंचावणारी कामगिरी करा. आपण फार मोठ्या संघर्षानंतर देश स्वतंत्र केला आहे. देशाच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका, असे ते म्हणाले.मिल्खा यांच्या हस्ते रिओ आॅलिंपिकला पात्र ठरलेला मल्ल नरसिंग यादव, रोर्इंगपटू दत्तू भोकनाळ यांच्यासह ईशा करवडे, तेजस्विनी मुळे, बालकल्याण संस्थेची गौरी गाडगीळ, वैष्णवी जगताप, पॅरा खेळाडू माधवी लता, भरत चव्हाण, बालकल्याणचे प्रशिक्षक अभिजित तांबे, अशोक नांगरे, गजानन पाटील, प्रवीण ढगे, राजेंद्र सापटे, धीरज मिश्रा, दीपाली निकम, बीईजीचे जगन्नाथ लकडे, सी. प्रकाश, सागर ठाकूर, अँथनी दास परेरा, तसेच राजू दाभाडे, राहुल राणे यांचा सत्कार करण्यात आला.नरसिंगने सांगितले, की रिओ आॅलिंपिकसाठी माझी चांगली तयारी सुरू आहे. देशासाठी सुवर्णपदक जिंकणे हेच एकमेव ध्येय आहे. दत्तू म्हणाला, की आॅलिंपिक म्हणून वेगळी स्पर्धा असा माझा दृष्टिकोन नाही. महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करायची हाच निर्धार आहे. डॉ. विश्वजित कदम यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, की आपल्या देशाचे अनेक खेळाडू कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची नसताना आणि उलट ती प्रतिकूल असताना यश मिळवित आहेत. अशा पराक्रमी खेळाडूंचा प्रातिनिधीक सत्कार करणे हा पीआयएसईचा बहुमान आहे. (क्रीडा प्रतिनिधी)