शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी लागू, कारखान्यांवर छापे टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:32 IST

राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत शुक्रवारी तहकूब केल्याने, राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत शुक्रवारी तहकूब केल्याने, राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे. बंदी हटविण्यास न्यायालयाने आधीच नकार दिला आहे. बंदीच्या व्यवस्थित व परिणामकारक अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात प्लॅस्टिक कारखान्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिका-यांना दिले.राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा आदेश काढला होता. त्यास प्लॅस्टिक उत्पादक व वितरकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शुक्रवारी सुनावणी २० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर, पर्यावरणमंत्री कदम यांनी बैठक घेतली. त्याला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्या वेळी कदम म्हणाले की, जमा होणारे प्लॅस्टिक व त्यावरील ‘रिसायकलिंग’चा अहवाल आठ दिवसांत सादर करावा. पर्यटन व तीर्थस्थळे, यात्रा, उत्सवाच्या वेळी भाविकांना व ग्राहकांना प्लॅस्टिकच्याच पिशव्या दिल्या जातात, ते थांबवावे. प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन व साठा करणाºयांवर आणि दुकानदारांवर कारवाई करून, साठा जप्त करण्यात यावा.>थर्माकोलला गणेशोत्सवात सूट?गणेशोत्सवात थर्माकोलचे मखर वापरण्यास काहींनी परवानगी मागितली आहे. विकलेले मखर परत घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे हमीपत्र दिल्यास गणेशोत्सवासाठी थर्माकोलबंदी हटविण्याबाबत निर्णय घेण्याचा सरकारचा विचार आहे.>मोदींवर टीका; तयारी करून निर्णयकेंद्र सरकारच्या नोटाबंदीप्रमाणे प्लास्टिकचा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. नऊ महिन्यांपासून त्याची तयारी व अभ्यास सुरू होता. त्यामुळे लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झालेली आहे. नियम न पाळणारी मंडळीच दंडाच्या रकमेची चिंता करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.विनापरवाना प्लॅस्टिक उत्पादन करणाºया कारखान्यांवर गुन्हे दाखल करून ते सील करा. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण समिती आहे. तिने बंदीबाबत जनजागृती कार्यक्रमाचा आढावा घ्यावा.- रामदास कदम, पर्यावरण मंत्री>असा होईल दंडपहिल्यांदानियम मोडणे 5,000दुस-यांदानियम मोडणे 10,000तिस-यांदानियम मोडणे 25,000 व ३ महिन्यांचा होणार तुरूंगवास> कोणालाही दंडात सूट मिळणार नाहीबंदी असलेले 80%प्लॅस्टिक गुजरातमधून महाराष्ट्रात येते. ते आणणाºयास तीन महिन्यांची शिक्षा होईल. 1200टन प्लॅस्टिक कचरा रोज राज्यात तयार होतो. 17 राज्यांनी आतापर्यंत प्लास्टिक बंदी केली आहे. महाराष्ट्र अठरावे राज्य आहे.