शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खडकाळ जमिनीवर फुलविली डाळिंबाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:57 IST

यशकथा : युवा शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी तीन एकर खडकाळ माळरान जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे.

- आत्माराम गायकवाड (पाचोरा) 

वाडीशेवाळे (जि. जळगाव)  येथील युवा शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी तीन एकर खडकाळ माळरान जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे. यात त्यांनी ८२० रोपांची लागवड केली आहे. पाटील यांनी मे २०११ मध्ये ही लागवड केली. त्यांच्या बागेतील डाळिंबाला नाशिक व कोलकाता येथील मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. 

इतर व्यवसायापेक्षा पाटील यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरून विविध प्रयोग केल्याने यावर्षी त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. डाळिंबाची लागवड १०.१४ फूट अंतरावर केली असून, या बागेला ठिबक सिंचन संच, तसेच फवारणी यंत्र बसविले आहेत. डाळिंब बागेच्या लागवडीनंतर पाणीटंचाई, नैसर्गिक संकटे, तसेच तेल्यासारख्या रोगाच्या आक्रमणानंतरसुद्धा त्यांनी मोठ्या संयमाने बागेची निगा राखली आहे. कुठलीही तांत्रिक माहिती नसताना या पिकाबाबतची सर्व शास्त्रोक्त माहिती मिळवून त्यांनी बागेचे चांगले संगोपन केले आहे. 

बागेचे खत व पाणीव्यवस्थापनडाळिंब बागेत आंतरमशागत, पाणीव्यवस्थापन, बहरव्यवस्थापन, तसेच फळाची काढणी व विक्री याचे व्यवस्थापन ते करीत असतात. यावर्षी कडक उन्हापासून बागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी बागेवर सफेद नेटचे आच्छादन केले होते. त्यामुळे फळांचा उन्हापासून बचाव झाला, तसेच पाणी बचतीसाठी बागेतीलच गवत व काडीकचरा यांचा वापर करून नैसर्गिक आच्छादन केले होते. परिणामी, दुष्काळी परिस्थिती असतानादेखील त्यांच्या बागेत उत्कृष्ट फळे लगडली. डाळिंब हे पीक तसे खर्चिक व जोखमीचे पीक म्हणून ओळखले जाते. यावर्षी सध्या डाळिंबाचे दर घसरलेले असताना सुनील पाटील यांच्या डाळिंबाला उत्कृष्ट दर्जामुळे व्यापारी वर्गाकडून मोठी मागणी आहे.

यावर्षी बागेतून १० टन डाळिंबाची विक्री झाली आहे. पुढील वर्षी युरोपच्या बाजारात डाळिंबाची निर्यात करण्याचा त्यांचा मानस आहे. पाटील हे डाळिंब पिकासोबतच भाजीपाल्यातील टोमॅटो, कारली, गंगाफळ, मिरची या पिकांची उत्कृष्ट शेती करीत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा हा प्रयोग मार्गदर्शक ठरत आहे. 

सुनील पाटील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. वडिलोपार्जित खडकाळ शेतीत त्यांनी नंदनवन फुलविले आहे. त्यांचा खर्च अडीच लाखांपर्यंत झाला आहे. खर्च वजा जाता त्यांना सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. डाळिंब उत्पादक सुनील पाटील यांनी यानिमित्ताने लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. शेतकऱ्यांनी केवळ नापिकीला दोष देत कपाळावर हात न मारता अधिक जोमाने कार्य केल्यास शेती निश्चितच फायद्याची आहे, असे पाटील यांनी सांगितले. त्यांची शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी