शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास करताना नियोजन करा, वेळापत्रक ठरविल्याने होतो फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 05:07 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पनवेल येथील शशांक नाग हा अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

- वैभव गायकरकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पनवेल येथील शशांक नाग हा अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाला. नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेत तो शिक्षण घेत होता. त्याच्या या यशाबद्दल व त्याने घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत.प्रश्न - या यशाबद्दल तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?उत्तर - मला मिळालेल्या गुणांबद्दल मी खूप समाधानी आहे. मला खूप आनंद झाला आहे. मी कोणत्याही दडपणाखाली येऊन अभ्यास केला नाही. वेळ वाया न घालवता, जसा वेळ मिळेल, तसा मी अभ्यास करत राहिलो. विनाकारण मौजमस्ती करणे मात्र मी प्रकर्षाने टाळले.प्रश्न - तू कसा अभ्यास केलास?उत्तर - अभ्यास करताना प्रत्येक विषयाचे नियोजन करून मी अभ्यास करत असे. याकरिता मी स्वत: एक वेळापत्रक तयार केले होते. दिवसातून जसा वेळ मिळेल, तसा वेळापत्रकानुसार ठरल्याप्रमाणे विषयाचा मी अभ्यास करत असे. त्यामुळे प्रत्येक विषयासाठी चांगला वेळ मिळाला.प्रश्न-तणाव घालविण्यास काय केले?उत्तर - मला तबला वादनाचा छंद आहे. त्यामुळे अभ्यासादरम्यान तणाव आल्यास किंवा कंटाळा आल्यास मी तबला वाजवायचो. त्यामुळे मन शांत होत असे, तसेच संगीताची आवड असल्याने मी कधी-कधी आवडीची गाणी ऐकून तणावमुक्त होत असे.प्रश्न - भविष्यात तू काय ठरविले आहेस?उत्तर - मला विज्ञान क्षेत्रात माझे योगदान द्यायचे आहे. या दृष्टीने मी पुढील क्षेत्र निवडणार आहे. माझे वडील माझे रोल मॉडेल आहेत. ते शास्त्रज्ञ आहेत. मलाही त्यांच्यासारखे शास्त्रज्ञ होण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.प्रश्न - विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करशील?उत्तर - नव्याने बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू इच्छितो की, वेळेला महत्त्व द्या. वेळेचा अपव्यय करू नका. बोर्ड, तसेच महाविद्यालयीन दोन्ही परीक्षांना तेवढेच महत्त्व द्या. विशेष म्हणजे,सोशल मीडिया व मोबाइलचा अतिवापर करू नका.प्रश्न - शिक्षक आणि पालकांनी कशी मदत केली?उत्तर - माझ्या यशात शिक्षकांसह पालकांचाही खूप मोठा वाटा आहे. डीएव्हीच्या प्राचार्य जयश्री खांडेकर यांनी वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य केल्याने मी हे यश गाठू शकलो. महत्त्वाचे म्हणजे, माझ्या कुटुंबीयांनी अभ्यास करण्यासंदर्भात कोणतीही बंधने कधीच घातली नाहीत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र