शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात विमान कोसळले

By admin | Updated: April 27, 2017 01:47 IST

गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी विमान, बुधवारी महाराष्ट्र-मध्य प्रदेश

विजेंद्र मेश्राम/हुपराज जमईवार/ खातिया/परसवाडा (गोंदिया)गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी विमान, बुधवारी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीत कोसळले. यात प्रशिक्षक व शिकाऊ वैमानिक तरुणी जागीच मृत्युमुखी पडले. रंजन गुप्ता (४५) आणि हिमानी गुरुदाससिंह कल्याणी (२४ रा. दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत.‘डीए-४२ नाईक’ या चार आसनी विमानाने बिरसी विमानळावरून सकाळी ९.२५ उड्डाण केल्यानंतर, जवळपास ९.४० पर्यंत हे विमान एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) रूमच्या संपर्कात होते, त्यानंतर संपर्क तुटला. पण १० मिनिटांत संपर्क न झाल्यामुळे एनएफटीआय आणि बिरसी विमानतळाच्या संचालकांना एटीसीने माहिती दिली. शोधाशोध केली असता, हे विमान गोंदियापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरी-लावणी या गावाजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात आढळले.‘रोप-वे’च्या तारांमध्ये अडकलेहे विमान वैनगंगा नदीवरून अत्यंत खालच्या बाजूने उडत येत होते. त्यामुळे वैनगंगा नदीच्या काठावरील दोन तीरांवर असलेल्या देवरी आणि लावणी गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटू नये, म्हणून तयार केलेल्या ५० फूट उंचीवरील रोप-वे च्या ताराला ते स्पर्शून गेले. त्यानंतर, अनियंत्रित होऊन नदीपात्रात कोसळले. विमान कोसळले, त्या वेळी नदी पात्रात कपडे धूत असलेल्या तीन महिलांपैकी इंतू चैनलाल मेश्राम (१९) ही तरुणी किरकोळ जखमी झाली.दिल्लीचे चौकशी पथक रवानाया छोट्या विमानात ब्लॅक बॉक्स नसतो. त्यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्लीवरून तंत्रज्ञांना बोलविले आहे. ते येऊन तपासणी करेपर्यंत विमानाचे अवशेष नदीतून हलविता येणार नाहीत.- राजा रेड्डी, संचालक, बिरसी विमानतळ गोंदिया