शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुरड्यांचा गळा आवळून पित्याचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर (अहमदनगर) : सतत गरिबीशी झुंजणा-या बापाने आपल्याच चिमुरड्यांचा गळा आवळून खून केला. नंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावात घडली.पोखरी बाळेश्वर गावातील सोंडवस्ती येथे अशोक संतुजी फटांगरे (वय ३५) हा तरुण त्याची पत्नी कविता व प्रफुल्ल (वय ७, पहिली) हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर (अहमदनगर) : सतत गरिबीशी झुंजणा-या बापाने आपल्याच चिमुरड्यांचा गळा आवळून खून केला. नंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावात घडली.

पोखरी बाळेश्वर गावातील सोंडवस्ती येथे अशोक संतुजी फटांगरे (वय ३५) हा तरुण त्याची पत्नी कविता व प्रफुल्ल (वय ७, पहिली) हा मुलगा व अस्मिता (वय ११, पाचवी) ही मुलगी यांच्यासोबत राहत होता. मंगळवारी पत्नी कविता हिला अशोकने संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे माहेरी पाठविले होते. दरम्यान बुधवारी रात्री अशोक आपल्या दोन्ही मुलांसह झोपी गेला होता. मुलांना गाढ झोप लागलेली पाहून अशोकने दोन्ही मुलांचा दोरीने गळा आळवून खून केला. त्यानंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सकाळी शेजा-यांनी ही घटना पाहिली. त्यांनी तात्काळ संगमनेर पोलिसांना कळविले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनासाठी तिघांचेही मृतदेह संगमनेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.अशोक फटांगरे याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची आहे. अनेकांकडून त्याने हातउसने पैसे घेतले होते. या पैशांचा तगादा तसेच आजारपण याला कंटाळून अशोकने प्रफुल्ल (वय ७, पहिली) व अस्मिता (वय ११, पाचवी) यांचा गळा घोटून स्वत:ही गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.