शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या कानशिलावर पिस्तूल लावले

By admin | Updated: July 22, 2016 06:46 IST

तरुणीच्या कानशिलावर पिस्तूल लावून तिला दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याची खळबळजनक घटना खामला परिसरात गुरुवारी रात्री घडली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22 - तरुणीच्या कानशिलावर पिस्तूल लावून तिला दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याची खळबळजनक घटना खामला परिसरात गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी प्रतापनगर ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. संचिता राऊत असे पीडित तरुणीचे नाव आहे. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास ती एका मैत्रीणीसह खामला बाजारात भाजीपाला घेण्यासाठी जात होती. अचानक तिच्या बाजुला एक कार थांबली. आतमधील तीन पैकी दोन तरुण आले. त्यातील एकाने संचिताचे केस धरून तिच्या कानशिलावर पिस्तूल लावले. शिवीगाळ करून धमकी दिली. हे पाहून संचिताची मैत्रीण ओरडली. त्यामुळे आजूबाजूच्या मंडळीचे लक्ष वेधले गेले. गडबड होऊ शकते हे ध्यानात आल्याने आरोपी तरुण आपल्या कारमध्ये बसून पळून गेले. या घटनेची माहिती पीडित तरुणीने राष्टवादी काँग्रेसच्या पदाधिकारी नूतन रेवतकर यांना दिली. त्यांनी लगेच तरुणींना घेऊन प्रतापनगर ठाणे गाठले. पोलिसांनी परत तरुणींसोबत घटनास्थळ गाठले. पाहाणी केल्यानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.   माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या निवासस्थाना जवळचा परिसर असलेल्या खामल्यात रात्रीउशिरापर्यंत वर्दळ असते. तेथे अशी घटना घडल्याचे आणि दुस-या कुणालाही ती दिसली नसल्याचे पोलिसांना पटेनासे झालेले आहे. तरुणींच्या तक्रारीनुसार, ही घटना अंधा-या ठिकाणी घडली. संचिताने काही दिवसांपूर्वी गिट्टीखदान ठाण्यात एक तक्रार नोंदवली होती. त्याचा या घटनेसोबत संबंध आहे काय, ते तपासले जात आहे.