शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वधूच्या कौमार्य चाचणीवरून वाद, पिंपरीत विवाह समारंभात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 08:50 IST

एका विवाह समारंभानंतर पिंपरीतील झुलेलाल मंदिराजवळ समाजातील तरुणांमध्ये वाद झाला. मुलींची विवाहापूर्वीची कौमार्य चाचणी, या समाजातील प्रथेच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

पिंपरी (पुणे) : कंजारभाट समाजातील एका विवाह समारंभानंतर पिंपरीतील झुलेलाल मंदिराजवळ समाजातील तरुणांमध्ये वाद झाला. मुलींची विवाहापूर्वीची कौमार्य चाचणी, या समाजातील प्रथेच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.प्रकाश अंकुश साइंदे्रकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सनी मलक, अमोल भाट, मोहन तामचीकर, विनायक मलके, रोहित रावळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. समाजातील मुलींची विवाहापूर्वी कौमार्य चाचणी करण्याच्या प्रथेविरोधात काही तरुणांनी पुढाकार घेऊन ‘स्टॉप दी व्ही व्हर्च्यूअल’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे.प्रथेच्या विरोधात ग्रुपच्या माध्यमातून ते समाजातील तरुण-तरुणींमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजातील जात पंचायत पद्धतीविरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. काही दिवसांपासून जात पंचायत आणि कौमार्य चाचणी प्रथा त्यामुळे चर्चेत आली आहे. त्यावरून समाजातील दोन गटांत वाद होऊन हा प्रकार घटल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे भाटनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे.केवळ चर्चेमुळे वादंगपिंपरीत रविवारी कंजारभाट समाजातील एक विवाहसमारंभ झाला. त्या ठिकाणी कौमार्य चाचणी घेण्याबाबतचा असा कोणताही प्रकार घडला नाही. विवाह समारंभानिमित्ताने उपस्थित असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तसेच विविध ठिकाणांहून आलेल्यांमध्ये वाद झाला. समाजातील मुलींची कौमार्य चाचणी आणि जात पंचायत हेच चर्चेचे मुद्दे या वादाचे कारण ठरले. भारतीय दंड संहितेनुसार १४३, १४७, १४९, ३२३, ४२७ या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.- गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हा