शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात यात्रेला सुरुवात

By admin | Updated: January 13, 2017 02:12 IST

येथील नवसाला पावणारी, मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी, जागृत देवस्थान व परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेली श्री काळुबाई देवीची यात्रा

परिंचे : मांढर (ता. पुरंदर) येथील नवसाला पावणारी, मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी, जागृत देवस्थान व परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेली श्री काळुबाई देवीची यात्रा ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’ या जयघोषात सुरू झाली. यानिमित्त मांढर पंचक्रोशीतील आणि विविध जिल्ह्यातून आलेल्या भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या निमित्ताने मांढर ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आह़ेत. समस्त ग्रामस्थ मंडळ मांढर (ता. पुरंदर) यांच्या वतीने यंदादेखील काळुबाई देवीच्या भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या निमित्ताने बुधवार दि. ११ रोजी रात्री १० वाजता काळुबाई पालखीची ढोल ताशा, झांज, सनईच्या गजरात सर्व ग्रामस्थ, महिला यांच्या समवेत गावातून गुलाल उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावच्या चौकात गेल्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांची मिटींग घेण्यात येऊन पंंचकमिटी नेमून व प्रत्येकावर यात्रेची जबाबदारी सोपविण्यात आली. नंतर रात्री १२ वाजता देवीची काठी ढोल ताशाच्या गजरात ग्रामस्थ नीरा नदी (राजापूर, ता. भोर) येथे स्नान करण्यासाठी नेल्या. येताना भोंगवली ग्रामस्थांनी काठीचे स्वागत करून छबीना सादर केला . दुपारी १२ वाजता काळुबाई देवीच्या डोंगरावर मंदिराभोवती ढोल ताशा, झांज, सनईच्या गजरात गुलाल उधळत मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या गेल्या. त्यानंतर व १२ ते ३ श्रींची पूजा केली गेली. त्यानंतर मांढर पंचक्रोशीतील व सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथून आलेल्या भाविकांनी डोंगरावर देवीला नैवेद्य देऊन सुवासिनी जेवू घातल्या. यात्रे निमित्ताने काळुबाई मंदिर परिसरात प्रसाद, खेळणी, मिठाईची अनेक दुकाने सजली होती. रात्री ९ ते १ नवस फेडण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने रात्री १ ते ६ वाजेपर्यंत ढोल लेझीमचा कार्यक्रम आयोजित करून कै. अंकुश यदु पोमण यांचे स्मरणार्थ मच्छिंद्र अंकुश पोमण यांच्या वतीने प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख बक्षिसे तसेच संघास ग्रामस्थ मंडळ मांढर यांच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. (वार्ताहर) शुक्रवारी ७ ते १० वा. देवीची मिरवणूक होईल. सकाळी १० ते ४ व रात्री १० ते १२.३० वाजेपर्यंत वगसम्राट कवी मास्टर तुकाराम अहिरेकर यांच्या आश्रयाखालील मा. प्रकाश अहिरेकर सह मा. नीलेशकुमार अहिरेकर लोकनाट्य तमाशा मंडळ नारायणगाव यांचा करमणुकीचा कार्यक्रम व दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्याचा जंगी आखाडा होणार आहे. देवीच्या दर्शनासाठी पौष पौर्णिमेपासून पुढे पंधरा दिवस गर्दी असते.