शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तारांकित प्रश्नाला फुटले पाय! भाजपा आमदाराचा प्रताप, पटलावर येण्यापूर्वीच माहिती बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:22 IST

काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी पाठविलेले तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर येण्यापूर्वीच एका भाजपा आमदाराने त्या प्रश्नाचा संदर्भ देत परस्पर चौकशीचे निर्देश दिल्याने प्रशासन पार चक्रावून गेले आहे.

- गणेश देशमुखमुंबई : काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी पाठविलेले तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर येण्यापूर्वीच एका भाजपा आमदाराने त्या प्रश्नाचा संदर्भ देत परस्पर चौकशीचे निर्देश दिल्याने प्रशासन पार चक्रावून गेले आहे.मुंबईच्या काळाचौकी येथील माझगाव मजूर सहकारी संस्थेने बनावट बिलाच्या आधारे शासनाची १५ लक्ष रुपयांनी फसवणूक केल्यासंदर्भात विजय वडेट्टीवार, अमर काळे, हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, संतोष टारफे, सुनिल केदार, डी.पी.सावंत या काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांनी विधिमंडळ सचिवालयाकडे तारांकित प्रश्न पाठवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो अद्याप पटलावर आलेला नाही.तुमसरचे भाजपा आमदार चरणदास वाघमारे यांनी सदर तारांकित प्रश्नाचा संदर्भ देत गृह खात्याच्या उपसचिवांना १ मार्च २०१८ रोजी सहा मुद्यांवर चौकशीचे निर्देश दिले. आणखी एका प्रश्नाबाबतही असेच घडले. सार्वजनिक बांधकाम विभागात बदलीच्या नावावर दलालांनी केलेल्या फसवणुकीबाबत सदर आठ आमदारांनी तारांकित प्रश्न पाठविला आहे. या प्रश्नाचा संदर्भ देत आ. वाघमारे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपसचिवांना १ मार्च रोजी पत्र पाठवले आहे.सभागृहात येण्यापूर्वीच तारांकित प्रश्नांवर सत्ताधारी पक्षाचे आमदाराने चौकशीचे परस्पर निर्देश कसे दिले? तारांकित प्रश्नाची माहिती त्यांना कोणी दिली? दुसऱ्या सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाचा संदर्भ देऊन एखाद्या आमदाराला असे चौकशीचे पत्र देता येते का? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतात.- उपस्थित करावयाचे तारांकित प्रश्न संबंधित आमदारांकडून विधानमंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे पाठविले जातात. विधानमंडळ प्रशासन संबंधित खात्याकडून त्यासंबंधिची माहिती मागवते. हा सर्व दस्तऐवज सभागृहाच्या पटलावर येईपर्यंत तो सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात गोपनीयतेचा भंग झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.तारांकित प्रश्न स्वीकारला गेल्यानंतर प्रशासकीय व्यवस्थेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मी संबंधित खात्यांना पत्र दिले आहे. माझे पत्र कुणाला पाठीशी घालण्यासाठी नसून सखोल चौकशीसाठी आहे. त्यात गैर काय? इतरांच्या तारांकित प्रश्नांबाबतची माहिती मिळू नये, असा नियम नाही.- चरणदास वाघमारे,आमदार, तुमसर विधानसभा

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMumbaiमुंबई