शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया)

By admin | Updated: July 1, 2016 15:04 IST

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ दोन्ही राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे

 - मनोज ताजने

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ दोन्ही राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. हे स्थळ मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर जंगलाने वेढलेले आहे. उंच पहाडावरून कोसळणारे पाणी आणि तिथे गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण आहे. जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असते. इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केले, म्हणून त्याला हाजरा फॉल असे नाव पडले.जायचं कसं?-जवळचे विमानतळ - नागपूर- १८० किलोमीटर- बिरसी (गोंदिया)- ६० किलोमीटरजवळचे रेल्वे स्थानक - दरेकसा (फक्त पॅसेंजर गाड्यांचा स्टॉप) - १.५ किलोमीटर- सालेकसा (काही एक्सप्रेस व सर्व पॅसेंजर गाड्यांचा स्टॉप) - १० किलोमीटर- गोंदिया (सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा स्टॉप) - ५२ किलोमीटररस्ता मार्ग- नागपूरवरून १९० किलोमीटर (स्पेशल गाडीने येणे सोईस्कर).- गोंदियावरून ५५ किलोमीटर (एसटी बस उपलब्ध)(दरेकसा गाडीने पावणे दोन तासात पोहोचता येते. बस हाजराफॉल गेटजवळ थांबते)

बरोबर काय न्यावे आणि काय नेऊ नये-- सोबत खाण्यापिण्याचे पदार्थ न्यावेत.

- ध्वनीवर्धक यंत्र किंवा मादक पदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.राहण्याची सोय आहे का? की एका दिवसाची पिकनिक करावी-- पिकनिक एका दिवसाची करणे सोयीचे आहे. कारण तिथे मुक्कामाची सोय नाही. सालेकसा या तालुका मुख्यालयी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात बुकींग करून राहता येते. सालेकसा येथे भोजनालयाची व्यवस्था आहे. किंवा जिल्हा मुख्यालय असलेल्या गोंदिया येथे मुक्कामासाठी सर्व प्रकारची सोय आहे.पॉइंटचे ऐतिहासिक  महत्व. -- १५० वर्षापूर्वी मुंबई-हावडा (कोलकाता) रेल्वेमार्ग दरेकसा नजिक मोठ्या पर्वतरांगेत रेल्वेसाठी बोगदा तयार करण्यात आला. परंतू पहाडाच्या वरील भागातून वाहणाऱ्या ओढ्यांचे पाणी बोगद्यातून खाली पडू लागले. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वेसेवा विस्कळीत होत असे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी त्यावेळचे इंग्रजकालीन रेल्वे अभियंता हाजरा यांनी डोंगरातून येणारे सर्व पाणी एकत्रितपणे खाली प्रवाहित करण्यासाठी पहाडाचा काही भाग कापून तशी व्यवस्था केली. ते पडणारे पाणी धबधब्याच्या रूपाने खाली पडू लागले. तेव्हापासून हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले. आता त्या ठिकाणी लहान मुलांसह मोठ्यांसाठी विविध प्रकारे साहसी खेळ खेळण्याची व्यवस्था केली असून त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटक येत असतात.

  आणखी वाचा :

(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)

(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)

(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)

  •  

 

  •  

 

  •