शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

महिला स्नानगृहाच्या खिडकीतून काढले जायचे फोटो..

By admin | Updated: July 6, 2016 20:05 IST

पंढरपूर बसस्थानकाच्या सुलभ शौचालय संकुलातील महिलांच्या स्नानगृहाच्या पाठीमागिल बाजूच्या खिडकीतून काही टपोरी तरूण सारखे डोकावायचे तर कधी मोबाईल घेऊन व्हिडीओ आणि फोटोही काढत होते.

दीपक होमकर

पंढरपूर, दि. ६ : पंढरपूर बसस्थानकाच्या सुलभ शौचालय संकुलातील महिलांच्या स्नानगृहाच्या पाठीमागिल बाजूच्या खिडकीतून काही टपोरी तरूण सारखे डोकावायचे तर कधी मोबाईल घेऊन व्हिडीओ आणि फोटोही काढत होते. स्नानगृहात स्नान करताना एका प्रवासी महिलेलाच याचा अनुभव आल्यावर ती जोराने किंचाळली, प्रचंड घाबरल्याने तीचा रक्तदाब कमी झाला व ती तेथेच कोसळली. त्यानंतरही अनेकदा तक्रारी करूनही या मुलांचा त्रास कमी झाला नाही म्हणून महिलांचे स्नानगृह बंदच करुन टाकले अशी धक्कादायक माहिती शौचालय संकुलाचे व्यवस्थापक राजुकमार सिंग आणि येथील महिला कर्मचारी मंगल परमार यांनी लोकमतला दिली.

पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक पंढरीत येतात. वारीच्या काळात मठ, लॉज, हॉटेल मिळत नसल्याने एसटी स्थानकावरील सुलभ शौचालय व स्नानगृहातचे ते अंघोळ करायचे मात्र हे स्नानगृह महिलांसाठी सुरक्षित राहिले नाही अशी माहिती समोर आली.

शौचालय संकुलाच्या पाठीमागील बाजूस रेल्वेच रुळ आहे. रेल्वे स्थानकापासून समांतर अंतरावर रुळ रहावे यासाठी सहा फुटाचा कट्टा बांधून त्यावर रुळ बांधले आहे. रुळाचा कट्टा आणि शौचालय यांच्या मध्ये सुमारे पाच फुटाचे अंतर आहे. त्यामुळे या कट्ट्यावर उभे राहिल्यास स्नानगृहाची खिडकीपर्यंत मुलांची उंची पोचते. मात्र हा कट्टा आणि स्नानगृह यांच्यामध्ये सुमारे पाच ते सहा फुटाचे अंतर आहे त्यामुळे खिडकीच्या सिमेंटच्या जाळीतून बाथरुमध्ये खाली वाकून पाहणे शक्य होत नसल्याने मुलांनी खिडकीची जाळीच फोडून टाकली आहे. कहर म्हणजे जाळीच्या आत एक लाकडी फळी टाकून अनेकवेळा काही मुले महिलांच्या स्नानगृहातही प्रवेश करत होते अशी धक्कादायक माहिती कर्मचाऱ्यांनी सांगितली. येथील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी त्या मुलांनी हुसकाविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावरच दगडफेक करण्यात आली असल्याची तक्रारही त्यांनी ह्यलोकमतह्णकडे केली.महिला व मुलांना मोफत सेवा फक्त फलकावरच---शौचालयासाच्या वापरासाठी पुरुषांना दोन रुपये दर आकारावे व महिला मुलांना मोफत वापरण्यास देण्याचा नियम आहे. तसा अस्पष्ट अक्षरातील फलकही शौचालयाच्या ठिकाणी लावला आहे. परंतू येथील कर्मचारी महिलांना संकुलात येतानाच अडवितात व त्यांच्याकडून पाच रुपये सक्तीने वसूल करतात. पुरुषांनाही दोन रुपये असताना पाच रुपये दर सक्तीने वसूल करतात. अनेक वेळा सुट्टे पैसे नसतील तर त्यांना वेठीस धरले जाते. त्यामुळे महिला व मुलांची येथे कुचंबना केली जाते.---आम्ही परप्रांतिय आहोत येथे पोट भरण्यासाठी नोकरी करतो मात्र येथील स्थानिक गुंडाकडून आमला दमदाटी केली जाते. महिलांच्या स्नानगृहात डोकावल्यावर त्यांना हटकल्यावर त्यांनी आमच्यावरच दगडफेक केली त्यानंतर आम्ही तक्रार करूनही येथील अधिकारी, पोलिसांनी दखल घेतली नाही.राजकुमार सिंग, व्यवस्थापक, सुलभ शौचालय, पंढरपूर--एकटी महिला स्नानासाठी आली तर त्यांना आम्ही स्नानगृह देत नव्हतो कारण ते सुरक्षित नव्हते मात्र त्यांचा गृप असेल व ते एकजण स्नान करताना दुसऱ्या पहारा देत असतील तरच त्यांना स्नानगृह द्यायचो मात्र त्यातही धोका असल्याने अखेर स्नानगृह गेल्या सहा महिन्यापासून बंद ठेवले.-मंगल परमारकर्मचारी,सुलभ शौचालय, पंढरपूर