शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फोन टॅपिंग प्रकरण : सहा जीबीचा ‘तो’ पेन ड्राईव्ह 10 दिवसांत पोलिसांकडे द्या, सत्र न्यायालयाचे केंद्रीय गृह मंत्रालयाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 07:38 IST

Phone tapping case: फडणवीस यांनी ज्या ६ जीबीच्या पेन ड्राईव्हचा उल्लेख केला होता तो त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला? तसेच तो पेन ड्राईव्ह शुक्ला यांच्याकडूनच दिला गेला आहे का? यासाठी त्याची न्यायवैद्यकीय चाचणी होणे गरजेचे आहे.

मुंबई :  फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या गोपनीय अहवालाबाबत राज्य सरकारने मुख्य महादंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंगळवारी स्वीकारला आहे. तसेच, याबाबतचा अहवाल आणि त्यासोबत सादर केलेला ६ जीबीचा ‘तो’ पेन ड्राईव्ह १०  दिवसांत सायबर गुन्हे शाखेला देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाला दिले आहेत.

फडणवीस यांनी ज्या ६ जीबीच्या पेन ड्राईव्हचा उल्लेख केला होता तो त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला? तसेच तो पेन ड्राईव्ह शुक्ला यांच्याकडूनच दिला गेला आहे का? यासाठी त्याची न्यायवैद्यकीय चाचणी होणे गरजेचे आहे. तसेच त्यांचा ताबा मिळविण्यासाठी राज्य सरकारने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी झाली होती. मंगळवारी या राखून ठेवलेल्या निकालावर सुनावणी झाली. 

यादरम्यान, केंद्र सरकारकडून उत्तर देताना राज्य सरकारला नेमके काय हवे आहे? हे अस्पष्ट असल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे, तपास अधिकारी एसीपी नितीन जाधव यांनी ३ मे ते २३ सप्टेंबरदरम्यान दिल्लीतील गृह सचिवांना ‘ती’ कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह देण्यासाठी चार पत्रे पाठविण्यात आली होती. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी न्यायालयात दिली होती. 

देवेंद्र फडणवीस हे प्रमुख साक्षीदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी चारवेळा पत्रव्यवहार केला. ज्यामध्ये एका उत्तरात त्यांनी जबाब नोंदविण्याची तयारी दर्शवली. मात्र, अद्याप त्यांनी जबाब नोंदविला नाही. तसेच, फडणवीस प्रमुख साक्षीदार असून, तेच याबाबत खुलासा करू शकतात, असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला होता. त्यानुसार, न्यायालयाने याबाबतचा अहवाल आणि त्यासोबत सादर केलेला पेन ड्राईव्ह सायबर गुन्हे शाखेला देण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाला दिले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाCourtन्यायालय