शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप घोटाळ्यात मालकांचे अटकसत्र, तीन मालकांसह पाच जण जेरबंद ,आमदाराच्या भावाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 04:48 IST

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत रायगड येथील समर्थ कृपा पेट्रोलपंपाचे मालक जयदास तरे आणि तंत्रज्ञ विनोद अहिरे या दोघांना अटक केली. त्यानंतर,कल्याण-शीळफाटा, काटईनाका येथील साई पेट्रोलपंपाचे मालक संजयकुमार यादव आणि बुधवारी हाजी मलंगगड येथील सद्गुरू पेट्रोपपंपाचे मालक बाळाराम गायकवाड व तंत्रज्ञ डबरूधर मोहंतो अशा तिघांना अटक केली. अहिरे आणि तरे यांना गुरुवारपर्यंत तर उर्वरित तिघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. अहिरे याने डोंबिवलीतील तर मोहंतो याने नागपुरातील पेट्रोलपंपांवरील यंत्रांमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. पेट्रोलपंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणाºया डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सरनामक यंत्र असते. त्यामध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी इंधन देणाºया पेट्रोलपंपांवर ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आदेशानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने डोंबिवलीत १७ जून २०१७ रोजी पहिली कारवाई केली. त्यानंतर, राज्यभरात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली  कारवाईचे सत्र सुरू केले.पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी जशी छापासत्राची कारवाई करण्यासाठी पथके तयार केली होती, तशीच अटकसत्रासाठी पथके तयार केली आहेत. सध्या ४-५ पथके नेमल्याची माहिती पोलिसांनी दिली.२४ जणांना अटक : राज्यात टाकलेल्या १७५ ठिकाणच्या छाप्यात ९४ ठिकाणी मापात पाप असल्याची बाब पुढे आली होती. तसेच याप्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक केली असून ते सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील २३ जणांविरोधात मुख्य आणि पुरवणी असे दोन दोषारोपपत्र काही दिवसांच्या अंतरावर न्यायालयात सादर केले आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपCorruptionभ्रष्टाचारCrimeगुन्हा