शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Petrol, Diesel Tax Cut Row : पेट्रोल, डिझेल कर कपातीविरोधात पेट्रोल पंप चालक; गौडबंगाल काय? दर वाढणार? 

By हेमंत बावकर | Updated: May 28, 2022 10:19 IST

Petrol, Diesel Price: पंपचालकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या डिझेलमागे प्रति लीटर ३.५० रुपये आणि आणि पेट्रोलमागे प्रति लीटर ३.२५ रुपये कमिशन दिले जाते. हे कमिशन वाढलेल्या दरांच्या तुलनेत परवडत नाही, अशी ओरड पेट्रोल पंप मालकांची आहे.

- हेमंत बावकर

केंद्र सरकारने दोन वेळा इंधनाच्या अबकारी करामध्ये कपात केली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली आहे. अद्याप याचा फायदा नागरिकांना मिळालेला नसला तरी केंद्राच्या दर कपातीविरोधात पेट्रोल पंप चालकांची संघटना फामपेडा आक्रमक झाली आहे. याविरोधात येत्या ३१ मे रोजी नो पर्चेस डे आंदोलन करण्यात येणार आहे. 

३१ मे रोजी एकही पेट्रोल पंप कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाही. यामुळे १ जून रोजी पेट्रोल, डिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यामागे फामपेडाने अन्यायकारक कर कपात केल्याचे कारण दिले आहे. 

कोरोना काळात केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर अबकारी करात वाढ केली होती. मात्र, त्याचा फायदा पेट्रोल पंप चालकांना पोहोचला नव्हता. कच्च्या तेलाचे दर कमी झाले, तेव्हा केंद्राने पेट्रोल, डिझेलचा दर कमी केला नव्हता. त्यात अबकारी कर वाढवत जनतेला कर कपातीचा दिलासा दिला नव्हता. परंतू आता दोनवेळा केंद्राने हा वाढविलेला अबकारी कर कमी केला आहे. परंतू त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर झाला आहे. 

यामुळे पेट्रोल पंप चालकांनी आधीच जादा दराने पेट्रोल, डिझेल खरेदी केले होते. ते कमी केलेल्या दराने विकावे लागले आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जेव्हा कर वाढविला तेव्हा आम्हाला काहीच लाभ मिळाला नाही आणि जेव्हा कमी केला तेव्हा नुकसान कशासाठी सोसायचे, असा सवाल पेट्रोल पंपांच्या संघटनेने केला आहे. 

मग एवढे दर वाढले त्याचे काय? कर वाढलेल्याचा फायदा मिळालेला नसला तरी पेट्रोल, डिझेल कंपन्या जे दरदिवसाला दर वाढवत होत्या त्याचा फायदा पेट्रोल पंप चालकांना मिळालेला आहे, असे एका पेट्रोल पंप मालकाने सांगितले. परंतू, तो फायदा अबकारी कराच्या कपातीशी जोडता येणार नाही. कारण जेव्हा कंपन्या दर दिवसाला कर कपात करतील तेव्हा तो त्यात वजा होत जाईल. हिशेबाचा विचार करता केंद्र सरकारची ही कर कपात अन्यायकारक आहे. जेव्हा कंपन्या दर कपात करू लागतील तेव्हा नुकसान होईलच परंतू कर कपातीचेही वाढीव नुकसान होईल, असे या पंप चालकाने सांगितले. 

याचबरोबर पंपचालकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या डिझेलमागे प्रति लीटर ३.५० रुपये आणि आणि पेट्रोलमागे प्रति लीटर ३.२५ रुपये कमिशन दिले जाते. हे कमिशन वाढलेल्या दरांच्या तुलनेत परवडत नाही, अशी ओरड पेट्रोल पंप मालकांची आहे. सध्या पेट्रोल, डिझेलचे दर ७५ टक्क्यांनी वाढलेले आहेत. यामुळे कंपन्यांकडून माल खरेदी करताना पैसे जास्त लागत आहेत. यामुळे वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांना जास्त व्याज द्यावे लागत आहे. तसेच महागाईने खर्चही वाढला आहे, असे पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे आहे. जर कमिशन वाढले तर इंधनाच्या दरात कंपन्यांना वाढ करावी लागणार आहे. 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोल