शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसी घोटाळ्यातील आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका

By admin | Updated: February 7, 2017 19:37 IST

एलआयसी घोटाळा प्रकरणातील आरोपी तत्कालीन रोखपाल एडी़ बैनवाड याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 7 - जिल्हा पोलीस दलातील एलआयसी घोटाळा प्रकरणातील आरोपी तत्कालीन रोखपाल एडी़ बैनवाड याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तो रद्द करावा यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.लातूर जिल्हा पोलीस दलातील जवळपास अडीच हजार पोलिसांच्या ७ हजार विमा पॉलिसीच्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणात सहभागी असलेल्या झारीतील शुक्राचार्याचा शोध घेऊन त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी २७ नोव्हेंबर रोजी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक लता फड यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन रोखपाल एडी़ बैनवाड आणि एलआयसी एजंट पांडुरंग विश्वनाथ गीते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तातडीने एलआयसी एजंट गीतेला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने अटक केली. त्याची चौकशी सुरू असतानाच तत्कालीन रोखपाल ए़डी़ बैनवाड याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला बैनवाडला अटक करता येत नाही. या प्रकरणाचा अद्याप तपास आणि चौकशी पूर्ण झाली नाही. त्यासाठी बैनवाडची अटक महत्वाची असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी सांगितले. जोपर्यंत बैनवाडची अटक आणि चौकशी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत एलआयसी घोटाळ्याचे तपासाचे कामकाज पूर्ण होणार नाही. त्यासाठी जिल्हा न्यायालयाने मंजूर केलेला बैनवाड याचा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.