शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

समाज कल्याण विभागातील १२ कोटींच्या कथीत शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी याचिका

By admin | Updated: September 2, 2016 20:23 IST

शासनाच्या शालान्त परीक्षोत्तर शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती मध्ये सुमारे १२ कोटी रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे

- ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद , दि. 2 - शासनाच्या शालान्त परीक्षोत्तर शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती  मध्ये सुमारे १२ कोटी रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निदर्शनास येते, असे नमूद करुन १५ संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या समाज कल्याण आयुक्त, पुणे यांच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. 
 
आज सदर याचिका प्राथमिक सुनावणीस निघाली असता न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. के.के. सोनवणे यांनी राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाचे सचिव, आयुक्त, आणि सहायक आयुक्त यांना नोटीसा बजावण्याचा आदेश दिला. याचिकेची पुढील सुनावणी १३ सप्टेंबर २०१६ रोजी होणार आहे. 
 
स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप यांनी अ‍ॅड. बी.एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत समाज कल्याण आयुक्तांच्या २९ आॅगस्ट २०१६ च्या संस्था आणि महाविद्यालयांविरुद्ध ‘फौजदारी गुन्हे ’ दाखल करण्याच्या आदेशास औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. याचिकाकर्त्या संस्थेने इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नियमबाह्यरित्या अतिप्रदान केलेले ५८ लाख ५४ हजार ०७४ रुपये भरण्याची नोटीस प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, लातूर यांनी याचिकाकर्त्या संस्थेस दिली आहे. अशाचप्रकारे  ११ कोटी ७३ लाख ८९ हजार ५२३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निदर्शनास येते असे नमूद करुन १५ संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश समाज कल्याण आयुक्तांनी २९ आॅगस्ट रोजी दिला. 
 
आज सदर प्रकरण सुनावणीस निघाले असता शासनातर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, ३ मार्च २०१६ च्या आदेशानुसार सदर रक्कम ही ‘अतिप्रदान’ झाली आहे.  म्हणजेच वाटप झालेली रक्कम नियमबाह्य आहे. त्याच रकमेचा उल्लेख १२ आणि २९ आॅगस्ट च्या पत्रात आहे. शासकीय निधीचा अपहार असे दर्शवून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणे हे बेकायदेशीर व बेजबाबदार आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. सदर रकम शासकीय अधिकाºयांच्या मान्यतेनंतर संबंधीत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे. संबंधीत विद्यार्थी शिक्षण पूर्ण करुन गेले आहेत. साधारणत: सहा वर्षानंतर शासनाने वसुलीचे आदेश दिले आहेत. शिष्यवृत्तीच्या शासन निर्णयात गेल्या १३ वर्षात बदल झाला नाही.लेखापरीक्षकांनी काढलेला निष्कर्ष कपोलकल्पीत असुन त्याआधारे राज्य शासन चुकीची कार्यवाही करीत आहे, असे याचिकाकर्त्यांतर्फे मांडण्यात आले.  शासनातर्फे अ‍ॅड. सुजीत कार्लेकर काम पाहत आहेत.
 
या १५ शिक्षण संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश
शासनाने २०१४ साली विशेष पथकामार्फत मागील पाच वर्षाच्या शिष्यवृत्ती लेख्यांची तपासणी केली. त्यात ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिष्यवृत्ती दिली गेली असा निष्कर्ष शासकीय लेखा परीक्षकांनी नोंदविला. 
 
अशा खालील १५ संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश समाज कल्याण आयुक्तांनी दिला आहे. त्यात १. स्वामी विवेकानंद महाविद्यालय, उदगीर  , धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय, लातूर  , मॉडर्न कॉलेज आॅफ कॉम्पयुटर सायन्स, नांदेड , सावित्रीबाई फुले विज्ञान व बीसीए महाविद्यालय, वसमत, अनाथ, वूद्ध आनंदाश्रम संस्था, धुळे, संचलित निर्मल महाविद्यालय, शहादा, अमिना अ‍ॅनिमेशन अकॅडमी, धडगाव, जिल्हा नंदुरबार, सिस्टेल कॉम्पयुटर सेंटर, नवापूर, जि. नंदूरबार, एमआयटी कॉलेज आॅफ आयटी अ‍ॅन्ड मॅनेजमेंट जिल्हा नंदूरबार, जागृती तांत्रिक महाविद्यालय, नंदूरबार, अनाथ व्हयु अ‍ॅनिमेशन अकॅडमी, नंदूरबार, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, राजर्षी शाहू महाविद्यालय पॉलिटेक्नीक, किनवट, जिलञहा नांदेड, स्वामी रामानंदतीर्थ महाविद्यालय कंधार, जिल्हा नांदेड, राजर्षी शाहू तंत्रनिकेतन विद्यालय, कळंब, जिल्हा उस्मानाबाद आणि व्ही.जे. शिंदे तंत्रनिकेतन वअभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबाद या १५ संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश समाज कल्याण आयुक्त, पुणे यांनी संबंधीत सहायक आयुक्तांना दिले आहेत.